रवींद्र पाटील : निवडणुकीसाठी दुबईतून कॅश करून आणला निधी
गुहागर, ता. 22 : नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्या आवाजातील व्हॉईस नोट्स व काही व्हॉट्सॲप chats मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आल्या आहेत. पूर्व IPS officer रवींद्र पाटील हे 2018 साली झालेल्या बिटकॉइन घोटाळ्यातील investigation officer होते. परंतु त्यांनाच या घोटाळ्यात दोषी ठरवून १४ महिन्यांसाठी जेलमध्ये पाठवले गेले होते. आता याच रवींद्र पाटील ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत देऊन स्वत:कडील पुराव्यांतील सत्यतेविषयी सरकारने तपास करावा. अशी विनंतीही त्यांनी केली आहे. BITCOIN CASE
यातील गंभीर बाब म्हणजे या पुराव्यांमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे यांच्या आवाजातील व्हॉईस नोट्स व काही व्हॉट्सॲप chats, पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या तत्कालीन पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांचा बिटकॉइन्सच्या गैरवापरात सहभाग असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. BITCOIN CASE
कोण आहेत रवींद्र पाटील
पूर्व IPS officer रवींद्र पाटील यांच्या कंपनीने त्यांना क्रिप्टोकरन्सी तज्ञ म्हणून 2018 मध्ये एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोलावले होते. आणि त्याच केसमध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली 2022 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. या खटल्यासाठी त्यांनी १४ महिने तुरुंगात घालवले. त्यावेळी काय झाले, प्रकरण काय आहे आणि त्यांना का अडकवले? असे अनेक प्रश्न त्यांना पडले. त्यांच्यासोबत इतर सहकारीही होते. कारण ते केवळ सत्य शोधण्याचे काम करत होते. दोन दिवसांपूर्वी, गौरव मेहताने रवींद्र पाटील यांना 4-5 तास अनेक वेळा कॉल केला. परंतु त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. न जाणो, परत कोणत्या प्रकरणात अडकावयाचा प्रयत्न होऊ शकेल अशी भीती त्यांना वाटत होती. पण शेवटी, त्यांनी गौरवचा फोन घेतला तेव्हा गौरवने पाटील यांना सांगितले की, 2018 मध्ये, अमित भारद्वाजला अटक झाली. तेव्हा त्याच्याकडे एक क्रिप्टोकरन्सी हार्डवेअर वॉलेट होते. BITCOIN CASE
ते पाकीट लंपास करून त्याठिकाणी तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दुसरे पाकीट ठेवले. आणि फेक wallet दाखवून रवींद्र आणि त्यांच्या सहकार्यांना तुरुंगात टाकले. म्हणजे अटक रवींद्र याना झाली, पण खरे गुन्हेगार अमिताभ गुप्ता आणि त्यांची टीम होते. गौरव मेहताने फोनवर बोलताना अमिताभ गुप्ता आणि भाग्यश्री नवटाके या दोन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. तसेच सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचे व्हॉईस नोट्स ही या मेहतानेच रवींद्र पाटील यांच्याकडे पाठवले असा दावा पाटील यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर २०१९ व २०२४ या दोनही वेळच्या निवडणुकांमध्ये या बिटकॉईन्स च्या पैशाचा वापर केला गेला होता, आणि आता या विधानसभा निवडणुकीतसुद्धा बिटकॉइन्सचा वापर केला जात आहे, असा गौप्यस्फोट गौरवने रवींद्र यांच्याकडे केला आहे.” कोणत्याही एजेंसीच्या तपासाला मदत करण्यास तयार असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. BITCOIN CASE
गौरव मेहता
हा सारथी नावाच्या एका ऑडिट फर्मचा कर्मचारी आहे आणि या कहाणीतील महत्वाचं पात्र आहे. त्याच्या म्हणण्यानुसार एकदाच नाही तर याआधी अनेकवेळा दुबईला जाऊन बिटकॉईन्स विकून कॅश आणण्याचे काम त्याने केले आहे. परंतु आता निवडणुकीनंतर त्याला संपवून टाकण्यात येईल, अशी भीती वाटत असल्यामुळे त्याने या सगळ्या गोष्टींचा खुलासा रवींद्र पाटील यांच्याकडे केला असे त्याचे म्हणणे आहे. BITCOIN CASE