दिवंगत एस. डि. पवार यांचे मानसपुत्र आणि संत निरंकारी महात्मा थोर विभूती
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील कोळवली गावचे सुपुत्र आणि कोळवली पंचक्रोशीचे नेते दिवंगत एस. डी. पवार यांचे मानसपुत्र आणि संत निरंकारी महात्मा थोर विभूती पाचेरी सडा (मोंभार) भरतजी डिंगणकर यांचा ६० वा जन्मदिन मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. Birthday of Mahatma Bharatji Dingankar


दिवंगत एस. डी. पवार साहेब यांनी विद्यार्थांना शैक्षणिक दालन उभे करुन शैक्षणिक सेवा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली. ही आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी अनेक लढे व आंदोलने लढणारे पवार साहेब यांच्या प्रत्येक लढ्यात आणि आंदोलनात भरतजी डिंगणकर यांनी मोलाची साथ दिली. Birthday of Mahatma Bharatji Dingankar


भरतजी डिंगणकर यांचा जन्म १० जानेवारी १९६५ साली पाचेरी सडा (मोंभार) या दुर्गम आणि डोंगराळ भागात झाला. त्यावेळी घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. खडतर परिस्थितीतही शिक्षण आणि संघर्ष याची तयारी सुरु असताना १९८३ साली भरतजींनी आपल्या कुटुंबासाठी आर्थिक जबाबदारी स्वीकारुन नोकरी पत्करली हे करीत असताना त्यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात तसेच आध्यात्मिक कार्यात स्वतःला झोकून दिले. १९७९ साली त्यांनी आध्यात्मिक प्रवास सुरु केला. आ. शंकर गुणाजी डिंगणकरजी (दाढी महाराज) यांच्या प्रेरणेने त्यांनी संत निरंकारी मिशन जोडले. १९८६-८७ साली त्यांनी सांताक्रूज येथे सेवा दल युनिट क्रमांक २१२ मध्ये सेवा देणे सुरु केले. महात्मा यशवंत गुरव, महात्मा देवजी शिगवण, दत्तकुमार शिगवण यांच्या सहवासाने महात्मा भरतजी डिंगणकर यांनी गावाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा प्रचार आणि प्रसार अविरतपणे चालू ठेवला आहे. या त्यांच्या कार्यात पत्नी सुगंधा डिंगणकर, मुलगे समीर डिंगणकर व स्वप्निल डिंगणकर हे साथ देत आहेत. Birthday of Mahatma Bharatji Dingankar


यावेळी गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव, महेश गोवळकर, महात्मा दत्तकुमार शिगवण, महात्मा चंद्रकांत कुळ्ये, पाचेरी सडा (मोंभार) महात्मा कृष्णा साळवी, महात्मा सिताराम जोशी, महात्मा रमाकांत घडशी, कोळवली पंचक्रोशीचे नेते दिवंगत एस. एस. डी. पवार यांचे कार्यकर्ते संजिवन यादव, प्रकाश जोशी यांचेसह संत निरंकारी मंडळाचे पाचेरी सडा (मोंभार), भातगाव, गुहागर तालुक्यातील महात्मा उपस्थित होते. सर्वांनी भरतजी डिंगणकर यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. Birthday of Mahatma Bharatji Dingankar