पालशेत सोसायटीत बिर्जे गटाला धक्का
गुहागर ता. 06 : तालुक्यातील पालशेत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक काल झाली. या निवडणुकीत सोसायटीचे अध्यक्ष पंकज बिर्जे यांच्या पॅनलच्या परिवर्तन पॅनेलने पराभव केला. परिवर्तन पॅनेलचे सर्वच्या सर्व अकरा सदस्य निवडून आले. सत्ताधारी गटाचा एकही सदस्य निवडून आला नाही. Birje group shocked in Palshet society
परिवर्तन पॅनलचे प्रमुख रवींद्र कानिटकर, प्रचार प्रमुख प्रशांत सुर्वे, दत्तराज पाटील, अर्जुन अवेरे, शिरीष कीर, वैभव काळे, विजय घाणेकर, सुधीर कानगुटकर, सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी मतदारसंघातून निवडून आले. महिला प्रतिनिधी मतदारसंघातून दर्शना गोंधळी व मंजुळा तांबे निवडून आल्या. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातून राजेंद्र नरवणकर व मागासवर्गीय मतदार संघातून मनोज नागे हे निवडून आले आहेत. Birje group shocked in Palshet society


गुहागर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात भालचंद्र तथा आप्पा बिर्जे यांचे मोठे स्थान आहे. त्यांच्या पश्चात पालशेत विविध कार्यकारी सोसायटीचा कारभारामध्ये पंकज बिर्जे यांनी लक्ष घातलं होते. अनेक वर्ष बिर्जे गटाच्या अधिपत्याखाली पालशेत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी होती. यावेळी मात्र बिर्जे गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. Birje group shocked in Palshet society


सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाचा गैरव्यवहार भ्रष्टाचार याबाबत कानिटकर व सुर्वे यांनी आवाज उठवला होता. मात्र या आरोपांकडे सत्ताधारी पक्षाने गांभीर्याने पाहिले नाही, पुढे आरोप करणाऱ्याच मंडळींनी एकत्र येत परिवर्तन पॅनेल ची स्थापना केली. रवींद्र कानिटकर आणि प्रशांत सुर्वे या दोघांनी पुढील वर्षभरात सोसायटीमधील सभासदांना गैर व्यवहार भ्रष्टाचार यांची माहिती देण्यास सुरुवात केली. या सर्वाचा परिणाम म्हणून सत्ताधाऱ्याविरुद्ध एक वातावरण बनले होते. त्याचाच फायदा सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलला झाला. Birje group shocked in Palshet society