जिल्हा पहायला एक दिवस परदेशी पाहुणे येतील; उदय सामंत
रत्नागिरी, ता.19 : विविध विकास कामांमधून रत्नागिरीचा कायापालट होत आहे. यातून पर्यटन वाढीसाठी फायदा होणार असून, एक दिवस परदेशी पाहुणे रत्नागिरी जिल्हा पहायला येतील, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. Bhumipujan of crores works by the guardian minister
विश्वनगर येथील बगिचा विकसित करणे, खाऊ गल्ली विकसित करणे, जिजामाता गार्डन शेजारील खाऊ गल्ली विकसित करणे, ध्यान केंद्राचे बांधकाम, शिर्के उद्यानाचे सुशोभिकरण, आठवडी बाजार मधील शॉपींग सेंटर, मुख्य रस्ते कॉंक्रीटीकरण, प्ले ग्राऊंड, जलतरण तलाव आदी 122 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, माजी नगरसेवक बिपीन बंदरकर, माजी नगरसेविका शिल्पाताई सुर्वे, माजी जि.प. सदस्य बाबू म्हाप, माजी नगरसेविका श्रध्दा हळदणकर, माजी नगरसेवक राजन शेटे, रोशन फाळके बाबू साळवी, सचिन वहाळकर आदी उपस्थित होते. Bhumipujan of crores works by the guardian minister


पालकमंत्री श्री सामंत म्हणाले, रत्नागिरीचा कायापालट झाला पाहिजे, अशी सर्वांची अपेक्षा होती. पालकमंत्री पद मिळाल्यावर काही आश्वासने दिली होती. त्या सर्व विकास कामांची वचनपूर्ती होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. त्या सर्वांची कृपादृष्टी जिल्ह्यावर आहे. शासनाची ही कामे जनतेपर्यत पोहचविण्याचे काम नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी करावे, असे सांगून पालकमंत्री श्री सामंत म्हणाले, रत्नागिरीमध्ये राज्यातील पहिले ध्यान केंद्र होत आहे. याठिकाणी भगवान गौतम बुध्दांची मूर्ती बसविण्यात येणार आहे. सर्व धर्माच्या-जातीच्या नागरिकांसाठी हे ध्यान केंद्र असेल. जे जे स्कूल ऑफ आर्टच्या सहय्याने शिर्के उद्यानात राज्यातील सर्वात उंच विठू माऊलीची मूर्ती बसविण्यात येणार आहे. मालगुंड येथे प्राणी संग्रहालय, निवेंडी येथे मॅंगो पार्क, थ्री डी मल्टीमीडिया शो, छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा या सर्वांमधून पर्यटनाला चालना मिळणार आहे. Bhumipujan of crores works by the guardian minister
ब वर्ग नगरपालिका हद्दीत रस्त्यांचे काँक्रीटीकरण होत असणारी आपली पहिली नगरपालिका आहे. विमानतळाच्या धावपट्टीसाठी 140 कोटी, टर्मिनल इमारतीचे काम वेगाने सूरु आहे. या सर्वांमधून पर्यटन वाढीस लागेल आणि निश्चितच एक दिवस परदेशी पाहुणे आपला रत्नागिरी जिल्हा पहायला येतील. ही सर्व कामे दर्जेदार आणि पारदर्शकपणे झाली पाहिजेत, असेही पालकमंत्री म्हणाले. Bhumipujan of crores works by the guardian minister