गुहागर, ता. 15 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा विकास कार्यक्रम सन २०२३/२४ मधून कोतळूक उदमेवाडी सुरेश आरेकर घर ते वसंत सकपाळ घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन माजी आमदार डॉ विनयजी नातू यांच्याहस्ते करण्यात आले. Bhumi Pujan by former MLA Natu of Kotaluk road
रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी माजी आमदार डॉ विनय नातू, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या माध्यमातून पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून या कामासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला त्या कामाचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. Bhumi Pujan by former MLA Natu of Kotaluk road
या भूमिपूजन कार्यक्रमासाठी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, कोतळूक सरपंच प्रगती मोहिते, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, भाजपा सरचिटणीस दिनेश बागकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष जगन्नाथ भोसले, कोतळूक सोसायटी व्हा. चेअरमन अनंत चव्हाण, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, आबा आरेकर, भाजपा बुथ प्रमुख अनिल आरेकर, पर्शुराम शिगवण, समीर आरेकर, नरेश बागकर, सुधीर सकपाळ, अजित राणीम, कमलाकर महाडीक, शेखर महाडीक, मनोहर महाडीक, दिपक जाधव, प्रियेश नार्वेकर, दशरथ पांचाळ, अनिल चव्हाण, वैशाली आरेकर, शितल सकपाळ, अंजली राणीम, अस्मिता चव्हाण आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. Bhumi Pujan by former MLA Natu of Kotaluk road