संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 16 : तळवली येथे पंचायत समिती गुहागर चे गट विकास अधिकारी (गट अ) श्री पी.पी.केळस्कर यांनी भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. तसेच कृषी स्वावलंबन विहिरीचे केळस्कर यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले. Bhoomi Poojan of Well by Kelskar
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना श्री अनिल पवार यांच्या सिंचन विहिरीचे लाभार्थी यांच्या शेतावर जाऊन भूमी पूजन केले. तसेच गावातील मोदी आवास व रमाई आवास घरकुले यांची पाहणी, फळबाग लागवड, बायोगॅस, mregs विहीर, कच्चे बंधारे, जलजीवन कामे, टाकी इत्यादी कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत कृषी अधिकारी श्री आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी श्री. एस. कांबळे, कृषी विस्तार अधिकारी श्री प्रतीक जाधव, ग्रामपंचायत अधिकारी श्री एस.आर. बागुल, ग्रा. पं. कर्मचारी, लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. Bhoomi Poojan of Well by Kelskar