सनसिटी वसई पश्चिम येथे कुणबी एकता प्रतिष्ठान भातगाव तर्फे आयोजन
गुहागर, ता. 22 : सनसिटी वसई पश्चिम येथे कुणबी एकता प्रतिष्ठान भातगाव अंतर्गत क्रिडा विभाग यांनी भातगाव चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे नूकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये २४ संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धा भातगावातील वरिष्ठांच्या उपस्थितीत खेळविण्यात आल्या. Bhatgav Cup 2023 Cricket Tournament
या स्पर्धेमध्ये प्रथम विजेता संघ श्री मालकेश्वर वाघजाई घेवडेवाडी, द्वितीय विजेता संघ दळखन कुणबीवाडी तर तृतीय विजेता संघ योगी 11 यांनी पटकावला. उत्कृष्ट फलंदाज दळखन कुणबीवाडी संघाचा प्रितेश याने नाव कोरले. उत्कृष्ट गोलंदाज श्री मालकेश्वर वाघजाई घेवडेवाडी संघाचा प्रमोद घेवडे तर मालिकावीर श्री मालकेश्वर वाघजाई घेवडेवाडी संघाचा प्रमोद घेवडे याने नाव कोरले. या स्पर्धेला पंच म्हणुन दिनेश वेले, योगेश वेले, पप्पु वेले, संजय वेलोंडे, रमेश वाडेकर, दिलीप वेले-पंड्या, मारुती वेले, निलेश गावडे, अविनाश वनये, अविनाश वेले, प्रदिप सोलकर, सागर मुंडेकर, अमित पाष्टे, सुनील सोलकर, सुनील डिंगणकर, सचिन वेले, संदेश फावरे यांनी काम पाहिले. यावेळी एकता प्रतिष्ठान भातगाव तर्फे सर्व सहभागी संघातील विजयी व पराजीत संघाचे, पंच यांचे मनःपूर्वक आभार मानले. Bhatgav Cup 2023 Cricket Tournament
या स्पर्धेला उदघाटक व अध्यक्ष श्री मुरलीधर आग्रे, उपाध्यक्ष श्री दिनेश वेले, सल्लागार श्री शंकर आग्रे, गोविंद मुंडेकर, दिलीप सुवरे, नामदेव वनये, देमा वेले, रविंद्र आग्रे, अविनाश आग्रे, प्रकाश वेले आणि सर्व क्रिकेट प्रेमी तसेच कुणबी समाजोन्नती संघ-मुंबई शाखा तालुका गुहागर अंतर्गत तवसाळ गटाचे अध्यक्ष श्री गिरीश बारस्कार, खजिनदार श्री प्रकाश कुल्ये, गुहागर तालुका कुणबी युवक मंडळ उपाध्यक्ष श्री भुपेंद्र गोणबरे यांनी संघटनेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धा खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करुन देणारे श्री निलेश हुमणे यांचे विशेष सहकार्य लाभले. Bhatgav Cup 2023 Cricket Tournament
भातगाव चषकासाठी लाभलेले देणगीदार
प्रथम चषक : कै. लक्ष्मण सखाराम आग्रे- गावकर आणि कै. लक्ष्मण चिमाजी आग्रे- मानकरी यांच्या स्मरणार्थ शिवसम्राट मित्रमंडळ भातगाव गोळेवाडी यांसकडून.
द्वितीय चषक: कै. लक्ष्मण लक्ष्मण आग्रे- गावकर आणि कै. लक्ष्मण चिमाजी आग्रे- मानकरी यांच्या स्मरणार्थ शिवसम्राट मित्रमंडळ भातगाव गोळेवाडी यांसकडून.तृतीय चषक: कै. रत्ना बेंडू वेले यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष रत्ना वेले व सुधीर रत्ना वेले यांसकडून.
गोलंदाज: उपाध्यक्ष श्री दिनेश प्रकाश वेले यांसकडून.
फलंदाज: ध्रुव-स्वरा हुमणे यांस कडुन.
मालिकावीर: थ्री स्टार- दिनेश वेले,निलेश हुमणे, प्रमोद वरवटकर यांसकडुन.
पाणी: कै कृष्णा भागोजी डिंगणकर यांच्या स्मरणार्थ श्री सुधीर कृष्णा डिंगणकर यांसकडून.
मेडिसिन किट: श्री देवेंद्र गावडे यांसकडून.
आर्थिक देणगीदार: कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर तवसाळ गट ५०० रुपये.
क्रिडा प्रमुख: किरण हुमणे, प्रदिप सोलकर, सचिन वेले, निलेश हुमणे, अविनाश वनये, अविनाश वेले, सुनील डिंगणकर, खजिनदार : किरण डिंगणकर, जगदीश सुवरे, यांना मोलाचे सहकार्य करणारे क्रिडा कमिटी सदस्य: ज्ञानेश्वर(नाना) वेले, रमेश वाडेकर, दिलीप मुंडेकर, प्रसाद वेले, मुकेश सोलकर, महेश डिंगणकर, उमेश मुंडेकर, संदीप मुंडेकर, रमेश पाष्टे, मोहन पाष्टे, नितेश पाष्टे, ऋतिक वनये, अजय पाष्टे, हितेश पाष्टे, अजित सुवरे, तुषार सुवरे, सतीश सुवरे, प्रसाद वेले, सिद्धेश वेले, प्रताप वेले, पप्पु वेले, राजेंद्र वेले. सागर पाष्टे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपुर्ण स्पर्धेचे समालोचक प्रमोद पाष्टे, विजय मुंडेकर लाभले. तर सूत्रसंचालन प्रमोद पाष्टे, मिलिंद मुंडेकर यांनी केले. Bhatgav Cup 2023 Cricket Tournament