माजी आमदार बाळ माने यांची उपस्थिती
रत्नागिरी, ता. 16 : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत व त्यांचा लाभ देणारी विकसित भारत संकल्प यात्रा शुक्रवारी सडामिऱ्या येथे पोहोचली. या यात्रेला सडामिऱ्या येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी या यात्रेमध्ये भाग घेतला. Bharat Sankalp Yatra developed at Sadamirya


यावेळी सडामिऱ्या गावच्या सरपंच सायली सावंत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक सूर्यकांत सावंत, दिनेश सावंत, पी. पी. सावंत, मिहिर माने यांच्यासमवेत अनेक ग्रामस्थ, महिला बचत गटांच्या सदस्य उपस्थित होत्या. या वेळी कॅलेंडर, डायरी वाटप करण्यात आले. तसेच गरिब कुटुंबांसाठी उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्यात आले. भारत पेट्रोलियमचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच शेतकऱ्यांना ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यात प्रगतीशील शेतकरी प्रशांत सावंत, निशांत सावंत, दिनेश सावंत आदींसह अनेक शेतकऱ्यांनी याची माहिती घेतली. या ड्रोनची किंमत ५ लाख रुपये आहे. त्याकरिता सबसिडीही आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. Bharat Sankalp Yatra developed at Sadamirya


केंद्र शासनाच्या अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहचल्याने त्यांच्या मनात अनेक योजनांबाबत संभ्रम असतो. तो संभ्रम दूर व्हावा, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि योजनांच्या पात्रतेविषयी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करता यावी, हा उद्देश घेऊन योजनांची प्रचार, प्रसिद्धी व्हावी यादृष्टिने विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात आली आहे. सडामिऱ्या येथे आज आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दीनदयाल अंत्योदय योजना आदींची माहिती देण्यात आली. स्कॉलरशिप योजना, मातृत्व वंदना योजना, उज्ज्वला योजना अशा विविध विभागांच्या योजनांची माहिती दिली. Bharat Sankalp Yatra developed at Sadamirya