गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेच्या युवा कमिटी अध्यक्षपदी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशचे सरचिटणीस श्री. साहिल प्रदीप आरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल श्री. आरेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे. Bhandari Youth Committee President Sahil Arekar
साहिल आरेकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, गुहागरचे माजी पंचायत समिती सभापती स्व. सदानंद आरेकर यांचे नातू आहेत. सिव्हिल इंजिनिअर असून ते स्वतः शासकीय ठेकेदार म्हणून कन्स्ट्रक्शन व्यवसायात काम करत आहेत. घरातच राजकीय वारसा असल्याने साहिल आरेकर यांनी महाविद्यालय शिक्षण पूर्ण होताच राजकारणात सक्रिय झाले. काका पद्माकर आरेकर हे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागर तालुका अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर या संस्थेचा कार्यभार हातात घेत सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात ते काम करत आहेत. Bhandari Youth Committee President Sahil Arekar


सन २०१८ ते २०२२ या कालावधीत श्री. साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदावर काम केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई जिल्हा केंद्र रत्नागिरीच्या युवा समन्वयक पदावर देखील ते काम करत आहेत. आपल्या लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुहागरात सांस्कृतिक चळवळ उभी केली आहे. अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा या क्षेत्रात देखील उल्लेखनीय काम सुरु आहे. गुहागर तालुका भंडारी संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. आरेकर यांनी सांगितले. Bhandari Youth Committee President Sahil Arekar