पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचे आवाहन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : कोणी अनोळखी व्यक्ती रात्री अपरात्री संशयास्पद फिरत असेल परप्रांतीय व्यक्ती कोणतीही वस्तू विकण्याच्या बहाण्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा व्यक्तींची माहिती कधीही आम्हांला कळवा आंम्ही पोलीस २४ तास आपल्या सेवेशी हजर आहोत. कोणताही गुन्हा घडण्याआधी त्याची आंम्हाला माहिती द्या. गर्दीच्या ठिकाणी असली दागिने घालून फिरु नका, बंद घरात मौल्यवान वस्तू ठेऊ नका. पोलीसांना सहकार्य करा. तसेच गणेशोत्सवात गर्दीच्या हंगामात वहाने मार्केटमध्ये ऊभी करु नका, गर्दी टाळा, नकली दागिने घाला कारण दागिने परत मिळवता येतात पण गेलेला जीव परत मिळवता येत नाही. त्यामुळे आपली आपल्या परिवाराची काळजी घ्या. सतर्क रहा, असे जाहीर आवाहन गुहागर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी केले. Be vigilant during Ganesh festival
ग्रामपंचायत आबलोली येथे सन २०२४ यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्ताने वाहतूक व्यवस्थापन, मार्केटमध्ये होणारी गर्दी आणि परप्रांतींय कींवा संशयीत व्यक्तीं पासून महिलांनी – नागरीकांनी घ्यावयाची काळजी आदी. महत्त्वाच्या विषयावर गुहागर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटना आबलोली तसेच वडाप संघटना, ट्रॅव्हल्स संघटना, रिक्षा संघटना यांच्या पदाधिकारी यांचेसह नागरीकांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांचा शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Be vigilant during Ganesh festival
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग आपली भूमिका चोख बजावत आहे त्यामुळे नागरीकांनी कोणतेही काम करताना हेतू चांगला ठेवा. कोण चुकीचा वागत असेल तर त्याला समजावून सांगा तुंम्ही कुणावरही हात उचलू नका. हॉटसप ग्रुपवर चुकीच्या पोस्ट करु नका. परप्रांतीय किंवा परक्या व्यक्तीपासून सावध रहा. भूल थापांना बळी पडू नका. सायबर फॉर्डचे प्रमाण आता शहरातून खेडेगावाकडे ग्रामीण भागात लागू झालेय त्यामुळे लिंक – ओटीपी आणि चुकिचा ऍप डाऊनलोड करु नका अकाऊंट खाली होईल त्यामुळे छोट्या – छोट्या गोष्टींची काळजी घ्या. दिनांक ३ सप्टेंबर २०२४ ते १४ सप्टेंबर २०२४ हे आठ दिवस गर्दीचा हंगाम सांभाळा आणि अनुसूचित प्रकार घडू देऊ नका पोलीसांना वेळीच खबर द्या असे जाहीर आवाहन पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी केले. Be vigilant during Ganesh festival
यावेळी आबलोली बीटचे अंमलदार किशोर साळवी, रविंद्र आठवले, प्रशांत पाटील, सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, उपसरपंच अक्षय पागडे, ग्रामसेवक बाबूराव सुर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, सचिन बाईत, सचिन कारेकर, यशवंत पागडे, महेंद्र कदम, प्रमोद गोणबरे, सागर रेपाळ, विनोद राजाराम कदम, गोपिनाथ शिर्के, अजित मोहिते, राजेंद्र काताळकर, सुनिल दाते, प्रतिक सुर्वे, सुभाष काजरोळकर, वैभव राऊत, विजय पागडे आदी उपस्थित होते. Be vigilant during Ganesh festival