गुहागर, ता. 24 : एक अधिकारी म्हणून प्रशासनाच्या कामाचा डोलारा यशस्वीरीत्या सांभाळून आपली सर्पमित्र ही ओळख कायम राखण्याची भूमिका सध्या गुहागर चे गटविकास अधिकारी शेखर भिलारे करत आहेत. नुकतेच कुडली येथे त्यांनी एका अजगराला जीवदान दिले आहे. BDO Shekhar Bhilare gave life to a python


कुडली गावातील कार्यक्रमातून येत असताना पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी श्री कदम यांच्या निवासस्थानी आलेल्या अजगर जातीच्या पिल्लाला गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी यशस्वीपणे पकडून त्याला जीवदान दिले. सुरुवातीपासून साप पकडण्याची आवड असलेल्या शेखर भिलारे यांनी यापूर्वी देखील अनेक सापांना जीवदान दिले आहे. प्रशासनात एका पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी काम करत असताना देखील श्री भिलारे यांनी आपला सर्पमित्र म्हणून असणारा छंद जोपासला आहे. यापूर्वी देखील रत्नागिरीहुन प्रशासकीय काम आटपून येताना त्यांनी एका सापाला जीवदान दिले होते. BDO Shekhar Bhilare gave life to a python