रत्नागिरीसह ११ ठिकाणी उमेदवार
मुंबई, ता. 25 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर बळीराज सेना व कुणबी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बळीराज सेनेच्या माध्यमातून आगामी ११ लोकसभा मतदारसंघात निवडणुका लढवल्या जाणार असून त्यांचे उमेदवार या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले, अशी माहिती बळीराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. Baliraj Sena will contest elections
यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ, सांगली, नाशिक, उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर अशा एकूण ११ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली जाणार आहे. यापैकी काही जागांवर उमेदवार नक्की झाले असून रायगड लोकसभा मतदार संघातून कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे संघाध्यक्ष भूषण बरे, मावळ मधून राजाराम पाटील, सांगली लोकसभेतून गणेश डांगे, नाशिकमधून धनंजय किनगावकर, उत्तर मध्य मुंबई मधून श्रावण बाळा इंगळे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उर्वरित सहा उमेदवार लवकरच जाहीर होतील, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. Baliraj Sena will contest elections