संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 01 : गुहागर तालुका बळीराज सेनेच्या विशेष पदाधिकारी यांची महत्वाची बैठक शृंगारतळी येथील जन संपर्क कार्यालयात उत्साहात झाली. यावेळी जन संपर्क कार्यालय प्रमुख म्हणून तळी शहर अध्यक्ष सुभाष रजपूत यांची निवड करण्यात आली. जनतेच्या कामासाठी भेटण्याची वेळ सकाळी 11 ते 2 अशी ठेवण्यात आली असून नागरिकांनी या वेळेत भेटावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. Baliraj Sena office bearer meeting


बळीराज सेनेच्या पुढील वाटचाली बाबत वरिष्ठ पदाधिकारी यांनी मार्गदर्शन करून सामाजिक राजकीय तसेच शासकीय विकास कामांचा आढावा घेतला व पदाधिकारी यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला तालुका अध्यक्ष अरुण भुवड, तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते, जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. सर्व प्रथम दिवंगत नेते नंदकुमार मोहिते तसेच सीमेवरील दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. Baliraj Sena office bearer meeting


बैठकीला जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते, तालुका अध्यक्ष अरुण भुवड, उपाध्यक्ष संतोष पास्टे, विधानसभा महिला आघाडी प्रमुख एश्वर्या कातकर, तालुका महिला आघाडी प्रमुख स्वप्नाली डावल, तालुका महिला सचिव स्वेतांबरी मोहिते, उपाध्यक्ष श्रावणी शिंदे, तळी शहर अध्यक्ष सुभाष रजपूत, कार्यकारणी सदस्य विनायक घाणेकर, अंजनवेल विभाग प्रमुख अशोक रावणंग, महिला आघाडी अध्यक्ष सौ. कातकर, डावल, तालुका सचिव सौ. मोहिते व अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. Baliraj Sena office bearer meeting