गुहागर, ता. 01 : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे “नमो चषक 2024” अंतर्गत एकदिवसीय डबल ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा गुहागर एज्यूकेशन सोसायटी येथे उद्या दि. 2 मार्च रोजी स. 8 ते रात्रौ 10 वा. या वेळेत खेळवल्या जाणार आहेत. Badminton tournament at Guhagar
सध्या सर्वत्र नमो चषक उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे करण्यात येत आहे. यापूर्वी शृंगारतळीमध्ये नमो चषक अंतर्गत टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आता गुहागर शहरात डबल ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 2 मार्च रोजी सकाळी 8 ते रात्रौ 10 या वेळेत होणार आहे. स्पर्धेसाठी 100 रु. प्रवेश फी आहे. स्पर्धेतील विजेत्या जोडीला 4 हजार 444 रुपये व आकर्षक चषक आणि उपविजेत्या जोडीला 2 हजार 222 रुपये व आकर्षक चषक असे बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संतोष सांगळे, मंदार पालशेतकर, कौस्तुभ गद्रे व हेमंत बारटक्के यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन भाजप युवा मोर्चा तर्फे करण्यात आले आहे. Badminton tournament at Guhagar