• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 November 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पांढरे रेशनकार्ड धारकांनाही मिळणार ‘आयुष्मान कार्ड’

by Guhagar News
June 21, 2024
in Health
147 1
1
Ayushman Card' for White Ration Card Holders
288
SHARES
823
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रेशनकार्ड आधारशी लिंक करण्याच्या सूचना

मुंबई, ता. 21 : केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेचा  लाभ मिळत आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार आयुष्मान योजनेच्या लाभार्थी घटकामध्ये पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढता येणार आहे. यासाठी त्यांना त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करावे लागणार आहे. Ayushman Card’ for White Ration Card Holders

शासनाच्या केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचा लाभ यापूर्वी मिळत होता. या योजनेपासून पांढरे रेशनकार्ड धारक हे वंचित होते. मात्र, शासनाच्या आरोग्य विभागाने या निर्णयात बदल करून पांढरे रेशन कार्ड धारकांना देखील या योजनेचा लाभ देण्याचे गेल्या वर्षी शासकीय परपत्रक काढून दिले होते. त्यामुळे आता या पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता व आयुष्यमान कार्ड मिळवल्यासाठी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका या आधार कार्डशी लिंक करणे महत्वाचे ठरणार आहे. Ayushman Card’ for White Ration Card Holders

आधार कार्ड व रेशन कार्ड लिंक असेल तरच त्यांना या त्या दृष्टीने पांढरी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहीम राबवावी तसेच पांढरे रेशनकार्ड धारकांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचे रेशन कार्ड आधारशी लिंक करावे असे आवाहन या अन्न, नागरी व पुरवठा संरक्षंण विभागाने केले आहे. केंद्र सरकारकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ राबविली जात आहे. या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. योजनेचा केसरी, पिवळ्या रेशनकार्डधारकांबरोबरच आता पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. यामध्ये शासकीय नोकरदार असले तरीही ते आयुष्मान कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात. Ayushman Card’ for White Ration Card Holders

Tags: Ayushman Card' for White Ration Card HoldersGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share115SendTweet72
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.