आरजीपीपीएल कंपनी व बालभारती पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजन
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने १६ मे ते ३१ मे २०२४ या कालावधीत स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत “स्वच्छता पंधरवडा” निमित्त विविध स्वच्छतेविषयी जन जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शृंगारतळी बाजारपेठेमध्ये आरजीपीपीएल कंपनीतील बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साफसफाई व स्वच्छतेचे महत्व नागरिकांना पथनाट्यातून पटवून दिले. Awareness about cleanliness at Sringaratali
शाळेत व घरी आरोग्य व स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजवण्याबाबत नागरिकांना या पथनाट्यातून प्रोत्साहित करण्यात आले, स्वच्छतेचे महत्व सर्व विद्यार्थ्यांनी नागरिकांना पटवून दिले. यावेळी कंपनीच्या वतीने सर्व नागरिकांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. याद्वारे “प्लास्टिक मुक्त भारत”निर्माण करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. यावेळी आरजीपीपीएल कंपनीचे एच आर मॅनेजर अमीत शर्मा, बालभारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजीत चटर्जी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतील कर्मचारी विद्यार्थी पालक व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. Awareness about cleanliness at Sringaratali