• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बाईपणाच्या उंबरठ्यावर कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

by Manoj Bavdhankar
January 23, 2024
in Guhagar
129 1
0
Award announced for Bavdhankar's collection of stories

प्राध्यापक मनाली बावधनकर

253
SHARES
723
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : गुहागरमधील प्राध्यापक मनाली बावधनकर यांच्या बाईपणाच्या उंबरठ्यावर कथासंग्रहाला मायबाप साहित्य प्रतिष्ठान टेंभुर्णी, सोलापूर यांचा  2022- 23 साठीचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ फेब्रुवारी, 2024 मधे होणार आहे.  असे संस्थेचे सचिव – श्री. विनोद तांबे यांनी मायबाप प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर केले. Award announced for Bavdhankar’s collection of stories

मायबाप साहित्य प्रतिष्ठान टेंभुर्णी यांचे वतीने  काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व ललित लेखन या साहित्य प्रकारात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रतिष्ठानचे चेअरमन शंतनु उंट, सचिव विनोद तांबे व  पदाधिकारी यांचेकडून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर, कोल्हापूर, जालना, बुलढाणा, ठाणे, नाशिक, रत्नागिरी इथून अनेक साहित्यकृती प्राप्त झाल्या होत्या.  याचा अंतिम निकाल संयोजन समितीनकडून सर्वानुमते जाहीर करण्यात आला. यात कादंबरी विभाग – हेडाम. लेखक – नागू विरकर. कथासंग्रह विभाग– बाईपणाच्या उंबरठ्यावर. लेखिका – सौ. मनाली बावधनकर. कविता संग्रह विभाग – सांजार्थ.  कवी – प्रताप वाघमारे, सिझर न झालेल्या कविता कवी – डॉ. सुनिल पवार. ललित लेखन विभाग – जीवनाचा उपासक कर्मवीर लोहकरे गुरुजी. लेखक – इंद्रजीत पाटील यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. Award announced for Bavdhankar’s collection of stories

Tags: Award announced for Bavdhankar's collection of storiesGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share101SendTweet63
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.