रत्नागिरी, ता. 08 : शिकवण आहे वेदांची नदी माता सगळ्यांची, वेद शिका, वेद पुढे जा, वेद वाचा, देश राखा अशा घोषणा देत आणि फलक प्रदर्शित करत रत्नागिरी शहरात वेदांचा जागर करण्यात आला. निमित्त होते क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे. कपाळी टिळा, पांढरे धोतर, उपवस्त्र, भगवी टोपी अशा पारंपरिक वेशभूषेतील पौरोहित, वेदाध्ययन करणारे तरुण, ज्येष्ठ या शोभायात्रेत सहभागी झाले. भगवा ध्वज, पताकाही फडकत होती. Awakening of the Vedas in Ratnagiri
![Awakening of the Vedas in Ratnagiri](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/02/gn0811-1024x617.jpg)
![Awakening of the Vedas in Ratnagiri](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/02/gn0811-1024x617.jpg)
शोभायात्रेचे उद्घाटन श्रीफळ वाढवून विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ वेद अभ्यासक डॉ. गणेश थिटे, प्रा. अंबरिष खरे, डॉ. दिनकर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथून सुरू झालेली शोभायात्रा टिळक आळी, आठवडा बाजारमार्गे राम आळी, गोखले नाका, लक्ष्मीचौक येथून परत पोहोचली. महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान (उज्जैन) आणि कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन केले. उद्घाटनापूर्वी सकाळी दीड तास ही शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये वेदांचे पठण करणारे पुरोहितही सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या सुरवातीला देवीच्या रूपातील वेशभूषा केलेल्या तरुणांचा ढोलपथकाने सर्वांची वाहवा मिळवली. Awakening of the Vedas in Ratnagiri
![Awakening of the Vedas in Ratnagiri](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/02/gn0813-1024x642.jpg)
![Awakening of the Vedas in Ratnagiri](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/02/gn0813-1024x642.jpg)
फलकांतून वेदजागरण
शिकवण आहे वेदांची गो माता सर्वांची, शिकवण आहे वेदांची नदी माता सगळ्यांची, वेदांची शक्ति, संकटातून मुक्ति, गावागावांत वेद शाळा, नगरानगरांत वेदशाळा, धर्म संस्कृती आणि ज्ञान वैदिक परंपरेचा मान, वेदांचे रक्षण प्रकृतिचे संरक्षण, वेदोंका कहना है, सबको समान रहना है, असे फलकही लक्ष वेधून घेत होते. Awakening of the Vedas in Ratnagiri