वॉशिंग्टन, ता. 10 : अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोईंग स्टारलाइनरद्वारे जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या सुनीता यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी आल्यामुळे त्या थेट पुढील वर्षीच पृथ्वीवर परतू शकतात. एजन्सी आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना SpaceX स्पेसक्राफ्टच्या मदतीने पृथ्वीवर आणण्यासाठी पर्याय शोधत आहे. Astronaut Sunita faced hurdles to return to Earth
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अवघ्या आठ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहून परतणार होते. पण, अचानक त्यांच्या परतीच्या मार्गात काही तांत्रिक अडचणी आल्या, ज्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दोघेही अंतराळात अडकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, आता ते दोघेही थेट 2025 मध्येच पृथ्वीवर परत येऊ शकतात. बोईंग स्टारलाइनद्वारे त्यांना परत आणले जाऊ शकत नाही, त्यामुळे आता इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीची मदत घेतली जाणार आहे. Astronaut Sunita faced hurdles to return to Earth
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून रोजी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानातून उड्डाण केले होते. ते आठवडाभर अंतराळात राहून जूनच्या मध्यात परतणार होते, पण थ्रस्टर आणि हेलियम लीकच्या समस्येमुळे त्यांना परत येता आले नाही. अनेक दिवसांपासून अंतराळात राहिल्यामुळे सुनीता विल्यम्स यांच्या शरीरावर परिणाम होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंतराळातील गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे सुनीता यांचे Muscle mass आणि Bone density कमी होत आहे. Astronaut Sunita faced hurdles to return to Earth
नासाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोइंग स्टारलाइनर अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी योजना तयार करत आहे. यामध्ये सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. 2025 मध्ये दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परत येऊ शकतात असाही एक पर्याय आहे. या प्लॅनमध्ये SpaceX देखील समाविष्ट आहे. कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच म्हणाले की, स्टारलाइनर स्पेसक्राफ्टद्वारे विल्मोर आणि सुनिता यांना परत आणण्याची नासाची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. त्यासाठी आम्ही नियोजन केले आहे. Astronaut Sunita faced hurdles to return to Earth