• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भर पावसात राष्ट्रीय महामार्गावर डांबरीकरण

by Manoj Bavdhankar
June 11, 2024
in Guhagar
191 2
50
Asphalting in heavy rains
375
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांचे मोडका घर येथील धरण पुलावर दुर्लक्ष

गुहागर, ता. 11 : विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर चक्क भर पावसात डांबरीकरण करण्याचा प्रताप या महामार्गाचे ठेका घेतलेल्या मनीषा कंट्रक्शनने केला आहे. आम्हाला वरिष्ठ पातळीवरून सांगितले आहे असे म्हणत भर पावसात डांबरीकरण करण्यात आले आहे. तर याप्रकरणी पाहणी करून त्यांच्याकडून पुन्हा महामार्गाची दुरुस्ती करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Asphalting in heavy rains

गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर राजकारणाच्या आश्वासनाने गाजलेला मोडका आगर धरणावरील पूल सध्या पावसातल्या डांबरीकरणाने पुन्हा चर्चेत आला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी महामार्गाला तडे गेले आहेत हे गेलेले तडे चार महिन्यापूर्वी बुजवण्यात आले मात्र पुन्हा हे तडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत तर दुसरीकडे मुख्य रस्त्यापासून असलेले संलग्न मार्गावर गेल्या दोन दिवसापासून दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले एवढेच नव्हे तर शनिवारी एकीकडे सकाळपासून कोसळणारा पाऊस तर दुसरीकडे मनीषा कंट्रक्शन ला ह्या भर पावसात डांबरीकरण करण्याचा नवीन प्रताप करून दाखवला आहे. मोडका घर पुलावर हे डांबरीकरण करण्यात आले असून काही ठिकाणी खराब काम व पडलेल्या तडा मिटवण्यासाठी हा डांबरीकरणाचा नवा फंडा सुरू केला आहे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्याम खुणेकर यांच्याजवळ अधिक माहिती घेतली असता सदर महामार्गाची डागडुजी करण्याचे काम मनीषा कंट्रक्शन चे आहे मात्र त्यांना भर पावसातून डांबरीकरण करावयास सांगितलेले नव्हते, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्याम खुणेकर यांनी सांगितले त्यामुळे जर ते काम खराब असेल तर पुन्हा ते काम करून घेतले जाईल असे स्पष्ट केले. Asphalting in heavy rains

मे महिन्यामध्ये व जूनच्या सुरुवातीला तीव्र स्वरूपाचा उन्हाळा होता अशावेळी ही डागडुजी व डांबरीकरण घेतले गेले नाही मात्र मनीषा कंट्रक्शन पावसातील डांबरीकरणाचा नवीन शोध लावला आहे. दरम्यान या पावसामुळे केलेले डांबरीकरण इतरत्र होणार आहे यामुळे दुचाकी अपघात होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जा राखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे मात्र ही यंत्रणा या महामार्गाच्या कामांमध्ये कोठेच दिसून येत नाही परिणामी सर्वकाही अलबेला असंच चित्र पहावयास मिळत आहे. Asphalting in heavy rains

Tags: Asphalting in heavy rainsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share150SendTweet94
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.