गुहागर, ता. 30 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी आर्या मंदार गोयथळे हिने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती जिल्ह्यात १७ वी तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात १२ वी आली म्हणून मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी मनसेच्या वतीने सत्कार केला. Arya Goythale felicitated by MNS
पुणे शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये गुहागर शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर ची विद्यार्थिनी आर्या मंदार गोयथळे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले सुयश संपादन केले. या यशाची दखल घेत गुहागर मनसेचे वतीने आर्या हिचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सत्कार केला. यावेळी मनसेचे गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, मनसेचे मुंडर शाखाध्यक्ष सूचित गांधी, मनसे कार्यकर्ते संतोष हेगिस्ते, पत्रकार गणेश किर्वे उपस्थित होते. Arya Goythale felicitated by MNS