रत्नागिरी, ता. 09 : पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत फाटक हायस्कूलच्या अर्णव पटवर्धन याने जिल्हास्तरीय शहरी गुणवत्ता यादीमध्ये ९९ वा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. Arnav Patwardhan Success in Scholarship Exam
फाटक हायस्कूलमधील शिक्षिका सौ. पूर्वा जाधव, सौ. आश्लेषा पटवर्धन, सौ. सुनीता गावित आणि संतोष भेलेकर यांचे अर्णवला मार्गदर्शन लाभले. तसेच आई सौ. मृणाल, वडिल मकरंद पटवर्धन व आजी-आजोबांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन लाभले. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर आणि फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन कीर यांनी त्याचे अभिनंदन केले. यापूर्वी अर्णवने विविध कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. Arnav Patwardhan Success in Scholarship Exam