गुहागर, ता. 26 : गेली 31 वर्षाची विद्यार्थी गुणगौरव सोहळाची परंपरा कायम राखत अखिल परिवार गुहागरचा विद्यार्थी गुणगौरव व विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे हॉल येथे संपन्न झाला. Appreciation Ceremony of Primary Teachers Union
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती गुहागरचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गावणकर तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते पराग कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय गुरव, पाटपन्हाळे गावचे सरपंच विजय तेलगडे, माजी नगरसेवक संजय मालप, अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, शासन मान्य सांस्कृतिक कलाकार मृदुंगमणी व वरवेली गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, शिक्षक नेते चंद्रकांत पागडे, माजी अध्यक्ष सुरेश बोले, सुधीर वासनिक, माजी सरचिटणीस अशोक पावसकर, शिक्षक नेते राजेंद्र वानरकर ,पत्रकार मंदार गोयथळे ,बाबासाहेब राशिनकर, तालुक्याचे पदाधिकारी निळकंठ पावसकर, गणेश विचारे, सतीश विचारे, सुधीर गोनबरे, उलघना पाटील अखिल परिवारातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. Appreciation Ceremony of Primary Teachers Union
यावेळी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती, नासा इसरो करिता निवड झालेले विद्यार्थी, नवोदय विद्यालयाला प्रविष्ट झालेले विद्यार्थी, इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, एन एम एम एस परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा, माजी मुख्यमंत्री शाळा तालुकास्तरावर विजयी शाळेचे मुख्याध्यापक, उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव रोख पारितोषिक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच सामाजिकतेचे भान ठेवून सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत 15 कलावंतांचा सत्कार करण्यात आला. Appreciation Ceremony of Primary Teachers Union
त्यावेळी बोलताना पराग कांबळे यांनी उपस्थिताना बालपणीच्या गमती जमती सांगितल्या. आजच्या विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्ष अशोक गावणकर यांनी अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघ गेले 31 वर्ष अव्याहतपणे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम राबवत असल्याबद्दल या संघटनेचे कौतुक केले. या संघटनेचे शिक्षकांसाठी असलेले कार्य खूप महत्त्वाचे आहे. संघटना राबवत असलेल्या विविध उपक्रमांचा मला सार्थ अभिमान असल्या बद्दल नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील, चंद्रकांत पागडे, सतीश विचारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अखिल परिवारातील शिलेदारांनी प्रयत्न केले. Appreciation Ceremony of Primary Teachers Union