• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 May 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसे गुहागरच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

by Mayuresh Patnakar
February 22, 2024
in Guhagar
232 2
1
Appointments of MNS office bearers
456
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा नेतृत्वाखाली गुहागर तालुक्याच्या वतीने रिक्त झालेल्या जागांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आल्या. श्रृंगारतळी येथील मनसे गुहागर तालुका संपर्क कार्यालय येथे नुकतीच पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. Appointments of MNS office bearers

यावेळी पडवे गण उपतालुका अध्यक्ष पदी सचिन गडदे, शुंगातली विभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार, कौढर गट अध्यक्षपदी किशोर कृष्णा बामणे, चिखली उपशाखा अध्यक्षपदी सागर चांदिवडे, यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या बैठकीला  गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गुहागर विधानसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधणी चांगल्या प्रकारे आहे सन्माननीय राजसाहेब याचं नेहमी वाक्य आहे की ऐक गेल्या तर शंभर तयार करु त्या प्रकारे गुहागर विधानसभेमध्ये बांधणी चालू आहे या वेळी उपस्थित गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, जितेंद्र साळवी, गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, प्रसिद्धी माध्यम प्रमुख प्रीतम सुर्वे, मुंढर शाखा अध्यक्ष, सुजित गांधी, कौंढर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, पालशेत विभाग प्रसाद विखारे, रानवी उपविभाग अध्यक्ष सुहास चोगले, वेलदुर शाखा अध्यक्ष वैभव आंबेकर, महाराष्ट्र सैनिक सुनील चांदीवडे, दीपक सुर्वे, अजय नार्वेकर, सुशील अडूरकर, आणि सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. Appointments of MNS office bearers

Tags: Appointments of MNS office bearersGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share182SendTweet114
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.