गुहागर, ता. 22 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा नेतृत्वाखाली गुहागर तालुक्याच्या वतीने रिक्त झालेल्या जागांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आल्या. श्रृंगारतळी येथील मनसे गुहागर तालुका संपर्क कार्यालय येथे नुकतीच पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. Appointments of MNS office bearers
यावेळी पडवे गण उपतालुका अध्यक्ष पदी सचिन गडदे, शुंगातली विभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार, कौढर गट अध्यक्षपदी किशोर कृष्णा बामणे, चिखली उपशाखा अध्यक्षपदी सागर चांदिवडे, यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या बैठकीला गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गुहागर विधानसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधणी चांगल्या प्रकारे आहे सन्माननीय राजसाहेब याचं नेहमी वाक्य आहे की ऐक गेल्या तर शंभर तयार करु त्या प्रकारे गुहागर विधानसभेमध्ये बांधणी चालू आहे या वेळी उपस्थित गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, जितेंद्र साळवी, गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, प्रसिद्धी माध्यम प्रमुख प्रीतम सुर्वे, मुंढर शाखा अध्यक्ष, सुजित गांधी, कौंढर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, पालशेत विभाग प्रसाद विखारे, रानवी उपविभाग अध्यक्ष सुहास चोगले, वेलदुर शाखा अध्यक्ष वैभव आंबेकर, महाराष्ट्र सैनिक सुनील चांदीवडे, दीपक सुर्वे, अजय नार्वेकर, सुशील अडूरकर, आणि सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. Appointments of MNS office bearers