रत्नागिरी, ता. 19 : शहरातील झाडगांव येथील रहिवासी ॲड. श्री. राजेश श्रीपाद काळे यांची भारत सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाकडून नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळे करार, शपथपत्र, कुलमुखत्यारपत्र इत्यादी दस्तऐवज साक्षांकित करण्याची सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध झाली आहे. Appointment of Rajesh Kale as Notary
ॲड. श्री. राजेश काळे यांनी रत्नागिरी येथे आपल्या विधी-व्यवसायाला सुमारे २३ वर्षांपूर्वी सुरुवात केली. ते सध्या रत्नागिरी जिल्हा न्यायालय तसेच देवरूख व अन्य तालुका न्यायालये, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, विविध महसुली न्यायाधीकरणे येथे त्यांनी वकीली केली असून राज्य आयोग, मुंबई तसेच राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली मध्येदेखील काम पहिले आहे. तसेच राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांच्या पॅनेलवरही ते कार्यरत आहेत. Appointment of Rajesh Kale as Notary


विधी-व्यवसायामध्ये असतानाच त्यांनी कायद्यामधील पदव्युत्तर शिक्षण (एल एल. एम.) देखील पूर्ण केले आहे. तसेच, वैकल्पिक वाद निवारण (ए.डी.आर.) मधील कोर्स, सायबर कायद्यामधील शिक्षणही घेतले आहे. वकीली व्यवसायापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारचे शिक्षण, म्हणजेच ‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ त्यांनी उत्तमरित्त्या पूर्ण केला आहे. भारत सरकारकडून ‘नोटरी पब्लिक’ म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ॲड. राजेश काळे यांचे त्यांच्या व्यावसायिक सहकाऱ्यांकडून तसेच समाजातील विविध घटकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. Appointment of Rajesh Kale as Notary