आबलोलीतील आप्पा कदम यांनी केले ९६ वेळा रक्तदान
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील आबलोली येथील समाज सेवक, “जिवनदाता”,”आबलोली भूषण” पुरस्कार प्राप्त आदरणीय विद्याधर राजाराम कदम उर्फे आप्पा कदम (वय ६४) यांनी आतापर्यंत ९६ वेळा रक्तदान करुन अनेकांना जिवदान दिले आहे. त्यांनी रक्तदानाची शतकपूर्तीचा संकल्प केला आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. Appa Kadam Birthday Blood Donation Camp
हे शिबीर प्रगतशील शेतकरी व उद्योजक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आबलोली गावचे सुपुत्र श्री.सचिनशेठ कमलाकर कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे आप्पा कदम मित्र परिवारा तर्फे आयोजित केले होते. या रक्तदान शिबीरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करुन आप्पा कदम यांच्या रक्तदानाच्या शतक पूर्तीकडे वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालय रत्नागिरी (रक्तकेंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी) यांचे वतीने डॉ.मिश्रा, परिसेविका सौ.रामपूरकर, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सौ.डोंगरे, रक्तपेढी परिचर श्री.प्रतिक आंबोरे, वाहन चालक श्री.संदिप वाडेकर यांनी रक्त संकलित केले. त्यानंतर आप्पा कदम यांचा जन्मदिन केक कापून मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. Appa Kadam Birthday Blood Donation Camp
यावेळी रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून मी ९६ वेळा रक्तदान करुन रक्तदानाच्या शतक पूर्तीकडे वाटचाल करीत आहे. आपणही एक वेळा रक्तदान करुन या राष्ट्रहिताचे सामाजिक काम अधिक बळकटीने करा असा मौलिक संदेश आप्पा कदम यांनी उपस्थितांना दिला आहे. यावेळी श्री.शरद साळवी, विकास कदम, बाळासाहेब लवटे, श्री.श्रिकांत कदम, श्री.छगनलाल पांडे, श्री.विनोद कदम, माजी सैनिक श्री.राजेश पवार, श्री.राजदत्त कदम, श्री.भूषण पवार, श्री.रितेश डिंगणकर, श्री.विश्वदिप कदम, श्री.नितिन मोहिते, ग्रामसेवक श्री.बाबूराव सुर्यवंशी, श्री.शैलेश पटेल, श्री.उदय पटेल, श्री.वैभव निवाते, श्री.सचिनशेठ कारेकर, श्री.आप्पा कदम, श्री.महेश भाटकर, श्री.स्वप्निल सुर्वे, श्री.असित कदम, श्री.महेंद्र कदम, श्री भिकूराम कदम, श्री.दिपक वैद्य आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. Appa Kadam Birthday Blood Donation Camp
यावेळी रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री.प्रितम रुके, जिल्हा सरचिटणीस श्री.आदेश मर्चंडे, रिपब्लिकन पक्षाचे गुहागर तालुकाध्यक्ष श्री.संदिप कदम, जेष्ठ मार्गदर्शक श्री.भिमसेन सावंत, प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अथर्वा बाईत, लिपीक व सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष पालशेकर,आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी नेटके, उपसरपंच श्री.अक्षय पागडे, माजी सरपंच सौ.श्रावणी पागडे, माजी सरपंच श्री.प्रविण भंडारी, ग्रामपंचायत सदस्या सौ.पायल गोणबरे, श्री.अनिकेत पागडे, आरोग्य मित्र श्री.विजय पागडे, श्री.उदय सुर्वे, श्री. संदिप पागडे, श्री.सचिनशेठ कारेकर, श्री.प्रमेय आर्यमाने, पोलिस पाटील श्री.महेश भाटकर यांनी आप्पा कदम यांना रक्तदानाच्या शतक पूर्तीकडील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Appa Kadam Birthday Blood Donation Camp