• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वानर आणि माकडे बंदोबस्त करावा

by Guhagar News
May 31, 2024
in Articals
174 2
0
Apes and monkeys settlement
342
SHARES
977
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकणातील वानर आणि माकडे यांची गणती अचुक किती ? – जनार्दन आंबेकर

GUHAGAR NEWS : शासनाच्या वन विभागाच्या माध्यमातून सद्या कोकणातील सर्वच तालुक्यांत वानर आणि माकडे यांची गणती (मोजणी) करण्याची फिरती मोहीम सुरू झाली आहे असे समजते. यासाठी अॅंडाॅईड (स्मार्टफोन) वापरणारे काॅन्टक्ट पद्धतीने नेमणुक केलेल्या तरूणांना प्रशिक्षण देऊन प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे ग्रुप करून गावागावांतून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एका तासात एक कि.मी. असे आजूबाजूच्या गावांतील पाय वाटेने दररोज पाच तास आणि किमान पाच कि.मी. अंतर पायी चालत जाऊन जंगलातील वानर आणि माकडे यांची गणती (मोजणी) करण्याची फिरती मोहीम सुरू करण्यात आली आहे. Apes and monkeys settlement

Apes and monkeys settlement

वन विभागाच्या माध्यमातून वन अधिकाऱ्यांनी आपल्या गुहागर तालुक्यात अशाच प्रकारचे नऊ गट तयार करून तीन दिवस फिरती गणती मोहीम राबविली आहे. सोमवार दि. २७.५.२०२४ रोजी उमराठ गावात आणि आजूबाजूच्या गावांतील परिसरात ग्रामस्थांच्या मदतीने पाय वायवाटेने चालत जाऊन अशीच गणती फिरती मोहीम राबविण्यात आली. काही ठिकाणी वानर /माकडे दिसली, तर काही ठिकाणी दिसली नाहीत. अशा प्रकारची मोहीम शासनाच्या वन विभागाच्या माध्यमातून राबविणे म्हणजे हास्यास्पद आणि आश्चर्यकारक बाब वाटते. फक्त एकाद्या पाय वाटेने फिरून एखाद्या गावातील वानर /माकडांची संख्या मोजणे शक्य आहे का ? वानर किंवा माकडे फक्त पाय वाटेच्या जवळपासच असतात का.? ती स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जंगलात सुद्धा कुठेही फिरत असतातच ना ? मग एखाद्या गावातील वानर किंवा माकडांची गणती/ मोजणी शंभर टक्के कशी काय करणार ? हा तर शासनाच्या वन विभागाचा वेळ काढूपणा नाही का? Apes and monkeys settlement

आज कोकणात भयानक परिस्थिती आहे. वानर, माकडे आणि उपद्रवी वन्य पशू यांच्या त्रासाला कोकणातील शेतकरी  बागायतदार अक्षरशः कंटाळून गेले आहेत. वानर, माकडे आणि उपद्रवी वन्य पशू यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. यांचा उपद्रव ऐवढा होत आहे की, शेतकऱ्यांनी शेती करणे तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि इतर भाजीपाला व फळबागा जोपासणे जवळजवळ सोडून दिल्या सारखे आहे. परंतु याचे शासनाला काही सोयरसुतक व सुख-दुखःच दिसत नाही. Apes and monkeys settlement

Apes and monkeys settlement

गेल्या वर्ष भरापूर्वी रत्नागिरीचे नामांकित शेतकरी व बागायतदार अविनाश काळे साहेब सहकाऱ्यांसोबत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर याच विषया संदर्भात बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र दुसऱ्या दिवशीच रत्नागिरीचे जिल्हाचे पालकमंत्री ना. उदय सामंत साहेब यांनी उपोषणकर्ते अविनाश काळे आणि सहकाऱ्यांची समजूत घालून  तुमच्या वेदना, भावना आम्ही जाणतो, आम्ही लवकरच वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आपल्या समस्या मांडून तुमची बैठक घडवून आणतो अशा प्रकारची बोलावण करून उपोषण मागे घ्यायला लावले. परंतु आजतागायत काहीच निष्पन्न झालेले नाही. Apes and monkeys settlement

आम्ही सुद्धा गेल्या वर्षी वानर, माकडे आणि उपद्रवी वन्य पशू यांच्या त्रासाबाबत ग्रामपंचायत उमराठच्यावतीने रत्नागिरीचे वन विभाग प्रमुख, चिपळूणचे प्रांत प्रमुख यांच्याकडे तक्रार केली असता वन अधिकाऱ्यांची, ग्रामस्थ शेतकर्‍यां सोबत झालेल्या बैठकीत चर्चे अंती आमच्या उमराठच्या ग्रामस्थ शेतकर्‍यांनी ठणकावून सांगितले होते की, आम्हाला नुकसान भरपाई नको तर या उपद्रवी प्राणी आणि वन्य पशूंचा कायमचा बंदोबस्त करा. नाहीतर आम्हाला शासनाने परवानाधारी विनामूल्य बंदुका द्या, आम्ही आमच्या शेती व बागायतींचे रक्षण करतो. परंतु अशा उपद्रवी प्राणी व वन्य पशू याबाबत लक्ष घालायला शासनाला वेळच दिसत नाही. Apes and monkeys settlement

सदर विषया बाबतीत मध्यंतरी कोकणातील अनेक संस्थांनी तसेच ग्रामपंचायतींनी आवाज उठवून सदर प्रश्न उचलून धरला होता. उपाय योजनांबाबत चर्चा झाली. उपाय सुचविण्यात आले. कोकणातील वानर आणि माकडे पकडून त्यांची अन्यत्र व्यवस्था करा. पकडून त्यांची नसबंदी करा. प्राणी मित्रांना एवढी सहानुभूती असेल तर त्यांनीच या उपद्रवी प्राण्यांना पाळा किंवा बंदोबस्त करावा. नाहीतर शासनाने कोकणातील शेतकरी व बागायतदार यांना मोफत लायसन्सधारी बंदूका देऊन शुट करण्यासाठी परवानगी द्यावी असे उपाय शोधावे लागतील. Apes and monkeys settlement

कोकणातील शेतकरी आणि बागायतदार यांना वानर, माकड आणि वन्य पशू यांच्या कडून होणाऱ्या त्रासाबाबत शासनाने अधिक अंत न पाहता वेळीच हस्तक्षेप करून निर्णय घेणे अत्यावश्यक आहे, नाहीतर कोकणातील शेतकरी व बागायतदार कायदा हातात घेऊन  स्वसंरक्षण आणि शेती व बागायतींचे रक्षण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, याची दखल शासनाने घ्यावी. Apes and monkeys settlement

Tags: Apes and monkeys settlementGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share137SendTweet86
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.