लांजा, ता. 21 : रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवशी कोकण रेल्वे मार्गावर उडपी रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेन खाली जाणार्या प्रवाशाचे प्राण वाचविण्याची धाडसी कामगिरी रेल्वे पोलिस अपर्णा के टी यांनी आज केली आहे. कोकण रेल्वेच्या धाडसी रेल्वे पोलीस अपर्णा यांना तातडीनं 5000 रूपये देउन कोकण रेल्वे कडून सन्मानित करण्यात आले आहे. Aparna saved the passenger’s life


मंगलोर ते मडगाव 06602 ही ट्रेन सकाळी उडपी स्टेशन रून मडगावला निघत असताना एक प्रवासी ट्रेन पकडायला जात असताना अचानक प्लॅटफॉर्म वरून पाय घसरून ट्रेनखाली जात असल्याचं कार्यरत आरपीएफ अपर्णा यांनी प्रसंगावधान राखून त्या प्रवाशाला धावत जाऊन बाहेर काढले आणि अपघातापासुन त्याला वाचविले. आज रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवस आहे. रेल्वे पोलिस रात्र दिवस प्रवासी यांचे प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सदैव तत्पर असतात. कोकण रेल्वे पोलिस यांनी अनेक वेळा धाडसी कामगिरी बजावली आहे. दरम्यान चालत्या ट्रेन मध्ये प्रवासी यांनी चडण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. Aparna saved the passenger’s life