हर्ष कातकर गुहागरमध्ये तृतीय; पाटपन्हाळे विद्यालयाचे विद्यार्थी
गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न झाली. इयत्ता आठवी ते दहावी गटात गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची इयत्ता नववीमधील विद्यार्थिनी कु.अनुश्री अभिजीत केतकर हिने रत्नागिरी जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच इयत्ता पाचवी ते सातवीमधील गटात पाटपन्हाळे विद्यालयातील कु.हर्ष प्रवीण कातकर याने गुहागर तालुकास्तरीय तृतीय क्रमांक संपादन केला. Anushree Ketkar third in Pragyashod exam


या स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयामधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेतील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सुयशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील, पर्यवेक्षक जी.डी.नेरले तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Anushree Ketkar third in Pragyashod exam