पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे आयोजन
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य विरोधी दिन मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस.एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेत नुकताच संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस. चव्हाण, श्री. आर. एम. तोडकरी, श्री. एस. बी. मेटकरी, श्री. एस.एम. आंबेकर, सौ. एन. पी. वैद्य आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. Anti Drug Day at Patpanhale High School
सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कुमारी सावनी दीक्षित, ऋतुजा भिडे, अलिना शेख, चैताली घाग, रिया गावणंग, पायल कुंभार, अनघा गावडे, देवयानी घरट, सई बारे, श्रेयशा नरळे, गुरु पवार या विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य, समाजात राबवलेले उपक्रम आदी मुद्द्यांनुसार मनोगत व्यक्त केले. कला शिक्षक श्री. एस.बी. मेटकरी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे जीवन व सामाजिक कार्य याबाबत माहिती देऊन आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य विरोधी दिन साजरा करण्याचे कारण, व्यसनाधीनता लागण्याची कारणे व त्यावर उपाय, व्यसनाधीनतेपासून सावधानता बाळगणे, मादक द्रव्य सेवनाचे दुष्परिणाम आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. Anti Drug Day at Patpanhale High School


कार्यक्रमाध्यक्षा सौ. चव्हाण यांनी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक प्रगतीसाठी महाराजांचे योगदान तसेच वाढती व्यसनाधीनता, व्यसनाधीनता टाळण्यासाठी करावयाचे उपाय, व्यसनाधीनता विरोधात समाजामध्ये करावयाची जनजागृती यावर मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमाचा स्वागत समारंभ विद्यार्थिनी मानसी पालकर व प्रज्ञा पवार यांनी संपन्न केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी मृण्मयी जाधव हिने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी आंबेकर हिने तर कु. मानसी पालकर हिने आभार मानले. Anti Drug Day at Patpanhale High School