• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समर्थ भंडारी पतसंस्थेतर्फे आर्या गोयथळे हिचा सत्कार

by Manoj Bavdhankar
May 20, 2024
in Guhagar
123 2
0
Annual General Meeting
242
SHARES
692
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती पात्र व इयत्ता आठवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेल्या श्री देव गोपाळकृष्ण विद्यामंदिर गुहागरची विद्यार्थिनी आर्या मंदार गोयथळे हिचा श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. या संस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी तिचा सत्कार करण्यात आला. Annual General Meeting

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती व ८ वी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये आर्या हिने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मध्ये 228 गुण मिळवून गुहागर मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. म्हणून आर्या हिचा श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांग मित्र पुरस्कार प्राप्त पत्रकार मंदार गोयथळे याचा संस्थेचे संचालक पराग आरेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ठ कर्मचारी म्हणुन महेश पवार व नितेश गोयथळे या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. Annual General Meeting

या सभेला श्री समर्थ भंडारी नागरिक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक दिलीप मयेकर ,सुहास भोसले, अरुण पाटील ,विजय जाधव ,पराग आरेकर, दिलीप वानरकर ,स्मिता आरेकर, प्रज्ञा नरवणकर, पल्लवी भाटकर ,उदय  वेल्हाळ, सचिव संदीप रहाटे व सर्व शाखेचे शाखाधिकारी कर्मचारी , सभासद ,पालक उपस्थित होते. Annual General Meeting

Tags: Annual General MeetingGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.