पतसंस्थेला १६ कोटी ६५ लाख ढोबळ नफा
गुहागर, ता. 04 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला आर्थिक वर्ष २०२४/२५ अखेर रूपये १६ कोटी ६५ लाख ढोबळ नफा झाला असून तरतुदी नंतर संस्थेला रुपये ६ कोटी ८५ लाख निव्वळ नफा झाला, असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री.प्रभाकर आरेकर यांनी दिली. संस्थेचे कार्यक्षेत्र कोकण विभाग असून १८ शाखा व ०२ कलेक्शन सेंटर कार्यरत आहेत. Annual Balance Sheet of Samarth Bhandari Credit Union
संस्थेने नियोजनबध्द कामकाज केल्यामुळे तसेच सभासद व ठेवीदार, कर्जदार यांचा संस्थेवरील विश्वास व सहकार्य यामुळेच संस्थेला विक्रमी नफा मिळालेला आहे. संस्थेने सिडी रेश्यो, एसएलआर, सीआरआर तसेच सीआरओआर व इतर सर्व आदर्श आर्थिक निकषांची पूर्तता करून संस्थेची प्रगती साध्य केली आहे. दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर संस्थेच्या एकुण ठेवी रु. २१९ कोटी ०४ लाख झाल्या. असून ठेवींमध्ये ३५ कोटी ८४ लाखांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे संस्थेचा एकुण कर्जव्यवहार रु.१७६ कोटी १८ लाख असून कर्ज व्यवहारामध्ये ३० कोटी ५६ लाख वाढ झाली आहे. दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर संस्थेचे भागभांडवल रु.१२ कोटी ८४ लाख, निधी १६ कोटी ७८ लाख, गुंतवणूका रु.८३ कोटी ०५ लाख तसेच संस्थेचे खेळते भांडवल रु.२७३ कोटी ९० लाख झाले आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ३९५ कोटी २२ लाख असून त्यामध्ये गतवर्षीपेक्षा रूपये ६६ कोटी ३९ लाख वाढ झालेली आहे. Annual Balance Sheet of Samarth Bhandari Credit Union


संस्थेने केलेल्या कर्जवितरणामध्ये सोनेतारण व स्थावरतारण कर्जासारख्या सुरक्षित कर्जाचे प्रमाण सर्वाधिक असून योग्य, सुरक्षित कर्ज वितरण व नियोजनबध्द वसुली यामुळे संस्थेच्या थकबाकीचे एकुण कर्जाशी प्रमाण केवळ ०.१२% इतके आहे. तसेच संस्थेने दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर एनपीओ चे प्रमाण शुन्य टक्के राखलेले आहे. संस्थेच्या नवीन चार शाखांना परवानगी मिळाली असून नवीन शाखा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सन २०२५/२६ साठी संस्थेने ३०० कोटी ठेवीचे उद्दिष्ठ ठेवले असल्याची माहिती मा.श्री प्रभाकर आरेकर यांनी यावेळी बोलताना दिली. Annual Balance Sheet of Samarth Bhandari Credit Union संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून सर्व शाखांमध्ये बँकिंगच्या बहुतांश सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संस्थेने केलेल्या प्रगतीमध्ये संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच सभासद, ठेवीदार, ग्राहक तसेच हितचिंतक यांचे महत्वाचे योगदान असल्याचे संस्थापक,अध्यक्ष मा.श्री.प्रभाकर आरेकर यांनी नमूद केले. Annual Balance Sheet of Samarth Bhandari Credit Union