• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा वर्धापनदिन

by Mayuresh Patnakar
May 5, 2024
in Guhagar
124 1
0
Anniversary of Taluka Apang Sanstha
243
SHARES
695
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05  : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २२ वा वर्धापनदिन शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय सर्व समावेशक वधु-वर सूचक मेळाव्यामध्ये 31 दिव्यांगानी सहभाग घेतला. Anniversary of Taluka Apang Sanstha

कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष उदय  रावणग  यांनी केले.  त्यांनी संस्थेने  गेल्या 20 वर्षात  केलेल्या कामाचा  आढ़ावा  घेतला. भविष्यात राबवणाऱ्या योजनाची  माहिती सांगितली. दिव्यांगाना रोजगार  उपलब्ध करुन देवून स्वावलंबी बनविने  हे संस्थेचे मुख्य उद्देश्य आहे असे सांगितले. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या व्यक्तिचा संस्थेमार्फत पत्रकार श्री. मंदार गोयथळे गुहागर, समाजसेवक श्री. संदेश हुमणे गुहागर व श्री. अमोल पेठे गुहागर यांना “दिव्यांग मित्र” पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रींफळ असे स्वरुप होते. तसेच  निधि  संकलन  उपक्रमात वैयक्तिक सर्वाधिक निधि  संकलन करणाऱ्या श्रीम. अन्नपूर्णा वैद्य प्राथमिक  विद्यालय च्या कु. सान्वी शैलेन्द्र खातू  व निधि सुनील रांजाने या विद्यार्थिनींचा  गोल्ड मैडल  व प्रशस्तिपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. साईनाथ पवार  यानी दिव्यांग मतदार याना मतदान बाबत मार्गदर्शन केले. तसेच  शासनाच्या विविध  योजनाची  माहिती सांगितली.  Anniversary of Taluka Apang Sanstha

यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि दिव्यांगासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमित आदवडे सर यानी केले. कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश अनगूडे, सरचिटणीस श्री. सुनील रांजाने, खजिनदार श्री. सुनील मुकनाक, सदस्य श्री प्रवीण मोहिते, सौ. सानिका रांजाने, श्री. भरत  कदम, सौ. मंगल अनगूडे, श्री. संतोष घूमे, श्री. संतोष  कदम यांनी विशेष प्रयत्न केले. Anniversary of Taluka Apang Sanstha

यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. साईनाथ पवार, जिल्हाध्यक्ष श्री. विलास गोरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. रविंद्र निवळे, वरवेली गावचे  सरपंच श्री. नारायण आगरे, राजापूर तालुका अध्यक्ष श्री. संतोष सावंत, लांजा तालुका अध्यक्ष श्री. लिगाण्णा भूसनूर, संस्थेचे  जेष्ठ सल्लागार श्री. विनायक ओक, गुहागर हायस्कूल मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे, श्रीमती अन्नपूर्णा विद्यालय  गुहागर मुख्याध्यापक श्री. समीर गुरव, गुहागर हायस्कूल पर्यवेक्षक सौ. सुजाता कांबळे, दिपाली जनसेवा प्रतिष्ठान उमरोली अध्यक्ष श्री. दिनेश भडवळकर, संस्थेचे सल्लागार श्री.प्रकाश बापट सर, श्री. किरण शिंदे  सर, बेलवलकर सर, सामाजिक कार्यकर्ता श्री. बाबा देवळेकर, चिपळूणचे  अशोक  भुस्कूटे, आरती निराधार सेवाकेंद्र चिपळूण सौ, नारकर मॅडम लांजा अपंग  संस्था  अध्यक्ष श्री. गौतम सावंत, पत्रकार श्री. गणेश  किर्वे, श्री. दशरथ  कदम  सर आदी मान्यवर व सर्व दिव्यांग बंधु भगिनी , त्यांचे पालक उपस्थित होते. Anniversary of Taluka Apang Sanstha

Tags: Anniversary of Taluka Apang SansthaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.