गुहागर, ता. 06 : कोकण हे कलेच माहेर घर संबोधल जात! कोकण म्हटलं की डोळ्यासमोर ती लाल-काळी माती. या कोकणात शक्ती-तुरा दाणेदार सप्ताह संपताच कोकणच्या मातीत मृदंगावर थाप पडली की, माणसांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण होतो. कोकणच्या लाल-काळी मातीतला कलाकार संघटित होऊन “नमन” कलेला बहुमुल्य वेळ देऊन आपली कला रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतो. कोकणच्या मातीत स्थापित झालेला अल्पावधीतच आपल्या बहारदार सादरीकरणाच्या जोरावर आणि नेहमीच काहीतरी वेगळेपण जपणारा व मुंबईसारख्या शहरात कोकणची लोककला नाटक, नमन सातत्याने राबवण्यात अग्रेसर असणारा कलामंच म्हणजे आम्ही कोकणकर. Anniversary of Konkankar Association


आजपर्यंत या कलामांचाने अनेक प्रयोग हाउसफुल करून रसिकांची मने जिंकवली आहे . आम्ही कोकणकर हि संघटना गेली १० वर्षे कार्यरत आहे. सदर संघटनेच्या वर्धापन दिन व कलाकार गुणगौरव सोहळा रविवार दि. ७ जुलै २०२४ रोजी ठीक संध्याकाळी ३.३० वा. वर्तक सभागृह विरार (वेस्ट) येथे संपन्न होणार आहे. Anniversary of Konkankar Association


या सोहळ्याचे मनोरंजन हमखास होणार कारण मी कोकणी निखिल व अमोल यांची जोडी येतेय गावरान कॉमेडीची फटकेबाजी करायला, सोबत किशोर येतोय कोकणी करामती घेऊन आपल्याला हसवायला, जोडीला नृत्याचा आविष्कार कवितांची जोड सोबत मंत्रमुग्ध करणारी संगीत पहायला मिळणार आहे. तरी या स्वप्नपूर्ती सोहळ्याला आपल्या परिवारासह उपस्थित रहा. असे आवाहन आम्ही कोकणकर संस्थापक / लेखक / दिग्दर्शक कृष्णा येदें यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९७७३१४२८१९ संपर्क करावा. Anniversary of Konkankar Association

