• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुणवत्ता शोध परीक्षेत अन्नपूर्णा विद्यालयाचे यश

by Manoj Bavdhankar
October 26, 2023
in Guhagar
130 1
0
Annapurna Vidyalaya's success in quality search exam
256
SHARES
730
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सांगली शिक्षण संस्था आयोजित परीक्षेत १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गुहागर, ता. 26 : सांगली शिक्षण संस्था आयोजित गुणवत्ता शोध परीक्षेत गुहागर शहरातील श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय गुहागर आणि श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेतील १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच शाळेत बक्षीस समारंभ पार पडला. Annapurna Vidyalaya’s success in quality search exam

सांगली शिक्षण संस्था आयोजित गुणवत्ता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता पहिली सेजल संजय पाटील पाचवी, इयत्ता दुसरी ऋग्वेद विक्रांत खरे सातवा, इयत्ता दुसरी साकेत समीर गुरव दहावा, इयत्ता तिसरी नेत्राली निखिल ओक 23 वी, तर केंद्रस्तर गुणवत्ता यादीत इयत्ता पहिली साई राजेंद्र गोडसे, दुसरा, इयत्ता दुसरी अभिज्ञा दिनेश पवार चौथा, इयत्ता तिसरी मधून वेद प्रदीप पवार दुसरा व शंतनु नवरंग पाटील तिसरा, इयत्ता चौथी दूर्वा दशरथ नाटेकर प्रथम, आराध्या संकेत गोयथळे दुसरा, शौनक नितीन दीक्षित तिसरा आ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तसेच इयत्ता सातवी मधून आर्या मंदार गोयथळे व रेईशा चौगुले या विद्यार्थ्यांनी केंद्र स्तरावर विभागून प्रथम क्रमांक पटकावला. Annapurna Vidyalaya’s success in quality search exam

या परीक्षेतील यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना नुकतेच रंगमंदिर येथे सन्मानचिन्ह, रोख रक्कम व पुष्प देऊन गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक पराग भोसले, मुख्याध्यापक समीर गुरव, संजय गमरे, पत्रकार संकेत गोयथळे व मंदार गोयथळे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. Annapurna Vidyalaya’s success in quality search exam

Tags: Annapurna Vidyalaya's success in quality search examGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.