गुहागर पोलीसांचे यश; दोघांना बेड्या तिघांचा शोध सुरु
गुहागर, ता. 10 : वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ही घटना 17 नोव्हेंबरला दुपारी 1.15 च्या दरम्याने नरवण गावातील सावली हॉटेलजवळ घडली. या गुन्ह्यातील दोन आरोपींना 8 डिसेंबरला गुहागर पोलीसांनी अटक केली आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे कोण होते, हा हल्ला राजकीय होता, पूर्ववैमनस्यातून करण्यात आला की घडवून आणण्यात आला या प्रश्र्नांची उकल पुढील काही दिवसात होणार आहे. Anna Jadhav’s assailants found
वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान कळंबट गावातील बौध्द समाजावर अन्याय झाल्याचा विषय उचलून धरला. चिपळूण बहादूरशेख नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मुंडण करुन घेतले. ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान विकास जाधव यांनी कळंबट येथील घटनेवरुन महाविकास आघाडीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना लक्ष्य बनविले होते. त्यानंतर 17 नोव्हेंबरला विकास तथा अण्णा जाधव त्यांच्या पत्नी आणि कार्यकर्त्यांसह दोडवलीत चालले होते. दुपारी नरवण येथील सावली हॉटेलमध्ये जेवण्यासाठी ते थांबले. दूरध्वनीवर बोलत विकास जाधव हॉटेल बाहेर आले तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. Anna Jadhav’s assailants found
विकास जाधव यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा तपास करताना गुहागर पोलीसांनी अनेक ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासली. त्याचबरोबर विविध मोबाईलचे टॉवर लोकेशन, संशयित आरोपींचे संभाषण आधी तांत्रिक बाबींचे विश्र्लेषण केले. त्यातून संभाव्य संशयितांची यादी बनवून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. या तपासातून अनुप नारायण जाधव रा. नारायण पॅलेस, राऊत चाळ जवळ, बॅरेज रोड बदलापूर पश्चिम आणि कुणाल किसन जुगे रा. घर न. 4445, अण्णा पाटील नगर, शिवानंद मठ शेजारी, अंबरनाथ पश्चिम यांचा सक्रिय सहभाग निष्पन्न झाले. त्यानंतर गुहागरच्या पोलीसांनी बदलापूर व अंबरनाथ येथून या दोघांना 8 डिसेंबरला अटक केली. Anna Jadhav’s assailants found
याच गुन्ह्यामध्ये आणखी 5 आरोपीचा सक्रिय सहभाग असल्याचे पोलीसांच्या तपासात पुढे आले आहे. गुहागर पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. 8 डिसेंबरला अटक केलेल्या अनुप जाधव आणि कुणाल जुगे यांना पोलीसांनी काल (ता. 9) मा. न्यायालय गुहागर येथे हजर केले होते. या दोघांनाही दि. 12.12.2024 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. या गुन्ह्याच्या तपासात रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीम. जयश्री गायकवाड, चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण राजेंद्र राजमाने तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व अन्य कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर गुन्ह्याचा तपास गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोपळे करत आहेत. त्यांना पोलीस निरीक्षक सचिन सावंत व गुहागर पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांची मदत मिळत आहे. Anna Jadhav’s assailants found