गुहागर, ता. 18 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर शाळेमध्ये नवसाक्षर परीक्षेकरिता भेट देणाऱ्या व शासनाचा नुकताच आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून गौरव झालेल्या सौ. अंकिता अरुण महाडिक बीट हेदवी यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मरणिका, पुष्पगुच्छ व विचार पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. Ankita Mahadik felicitations
सौ अंकिता महाडिक यांनी शासनाच्या आयसीडीएस महिला बालकल्याण योजना यांची प्रचार प्रसिद्धी व जनजागृती तळागाळात जाऊन सर्वसामान्य लाभार्थींपर्यंत पोहोचवली. शून्य ते सहा वयोगटातील बालके गरोदर माता, किशोरवयीन मुली यांचे आरोग्य. आहार लसीकरण तसेच लेक लाडकी या योजनेतून प्रभावी काम केल्यामुळे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, माजी बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते शासनातर्फे नुकताच आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी बोलताना मुख्याध्यापक मनोज पाटील म्हणाले की, अंकिता महाडिक यांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत आहे. त्यांच्या या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. सौ अंकिता महाडिक यांनी सत्कार आयोजित केल्याबद्दल उपस्थितांचे आभार व्यक्त केले. Ankita Mahadik felicitations
यावेळी मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सौ संध्या पालशेतकर, सौ विद्या रोहीलकर, मत्स्यगंधा कोळथरकर, प्राजक्ता रोहीलकर, यशवंत जांभरकर, सुहासिनी कोळथरकर, सत्यवती कोळथरकर, महानंदा वनकर, प्रकाश रोहीलकर, प्रेमलता रोहीलकर, रीना खडपकर, महादेव खडपकर, सुरेश रोहिलकर, ममता दाभोळकर, राजश्री रोहीलकर, शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, परीक्षित दाभोळकर, अंकिता कोळथरकर, सलोनी पालशेतकर आदी मान्यवर उपस्थित होते. Ankita Mahadik felicitations