• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पर्यवेक्षिका अंकिता महाडिक यांचा सत्कार

by Manoj Bavdhankar
March 18, 2024
in Guhagar
165 2
0
Ankita Mahadik felicitations
324
SHARES
926
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर शाळेमध्ये नवसाक्षर परीक्षेकरिता भेट देणाऱ्या व शासनाचा नुकताच आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून गौरव झालेल्या सौ. अंकिता अरुण महाडिक बीट हेदवी यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मरणिका, पुष्पगुच्छ व विचार पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. Ankita Mahadik felicitations

सौ अंकिता महाडिक यांनी शासनाच्या आयसीडीएस महिला बालकल्याण योजना यांची प्रचार प्रसिद्धी व जनजागृती तळागाळात जाऊन सर्वसामान्य लाभार्थींपर्यंत पोहोचवली. शून्य ते सहा वयोगटातील बालके गरोदर माता, किशोरवयीन मुली यांचे आरोग्य. आहार लसीकरण तसेच लेक लाडकी या योजनेतून प्रभावी काम केल्यामुळे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, माजी बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते शासनातर्फे नुकताच आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी बोलताना मुख्याध्यापक मनोज पाटील म्हणाले की, अंकिता महाडिक यांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत आहे. त्यांच्या या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. सौ अंकिता महाडिक यांनी सत्कार आयोजित केल्याबद्दल उपस्थितांचे आभार व्यक्त केले. Ankita Mahadik felicitations

यावेळी मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सौ संध्या पालशेतकर, सौ विद्या रोहीलकर, मत्स्यगंधा कोळथरकर, प्राजक्ता रोहीलकर, यशवंत जांभरकर, सुहासिनी कोळथरकर, सत्यवती कोळथरकर, महानंदा वनकर, प्रकाश रोहीलकर, प्रेमलता रोहीलकर, रीना खडपकर, महादेव खडपकर, सुरेश रोहिलकर, ममता दाभोळकर, राजश्री रोहीलकर, शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, परीक्षित दाभोळकर, अंकिता कोळथरकर, सलोनी पालशेतकर आदी मान्यवर उपस्थित होते. Ankita Mahadik felicitations

Tags: Ankita Mahadik felicitationsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share130SendTweet81
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.