रत्नागिरी, ता. 26 : गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटने कडून अखेर चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी सौ.अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी यावेळी चिपळूण संगमेश्वर मध्ये महिला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. ऍड.सुनील खंडागळे हे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरतील असेही संघटनेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मतदार संघातील मुद्द्यांना केंद्रस्थानी मानून ही निवडणूक लढण्याचा निर्णय गाव विकास समितीने घेतला असल्याचेही उदय गोताड यांनी म्हटले आहे. Anagha Kangane for Chiplun-Sangmeswar constituency
गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या वतीने चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या आधीच झालेला आहे. संघटनेच्या कोअर कमिटीने इच्छुक उमेदवारांपैकी दोन उमेदवारांची नावे,एडवोकेट सुनील खंडागळे व सौ.अनघा राजेश कांगणे यांची नावे अंतिम निर्णयासाठी संघटना नेतृत्वाकडे पाठवली होती.या दोन्ही नावांचा विचार संघटनेने केला. यापैकी सौ.अनघा कांगणे यांची उमेदवारी संघटने कडून निश्चित करण्यात आली. Anagha Kangane for Chiplun-Sangmeswar constituency
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, महिलांना न्याय देण्यासाठी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचं दुःख/समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक सक्षम महिला उमेदवार या विधानसभा निवडणुकीत द्यावा असा निर्णय गाव विकास समिती संघटनेचा अध्यक्ष म्हणून उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे आम्ही दोघांनी गाव विकास समितीच्या कोअर कमिटीशी चर्चा करून घेतला असल्याचे उदय गोताड यांनी याबाबत बोलताना सांगितले. Anagha Kangane for Chiplun-Sangmeswar constituency
सौ.अनघा कांगणे ह्या गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या महिला उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण – M.A बीएड झाले आहे. सात वर्ष खाजगी शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून काम केले आहे. बारा वर्षाहून अधिक काळ देवरुख, संगमेश्वर भागात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. तसेच कबड्डी व क्रीडा क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. Anagha Kangane for Chiplun-Sangmeswar constituency