रत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार
रत्नागिरी, ता. 21 : रत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार आहे. त्यासाठी सरकारी जमिनी नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र या जागांचा शोध सहकार विभागाला घ्यावा लागणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती एकच होती. मात्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात एक अशा प्रकारे आठ बाजार समित्या स्थापन होणार आहे. An agricultural produce market committee in the taluk


राज्यातील शेतकर्यांनी उत्पादित केलेला शेतमाल योग्य दरात आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम विपणन व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत राज्यातील २१ जिल्ह्यांतील ६५ तालुक्यांत नवीन बाजार समित्या स्थापन होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री अजित पवार यांनी एक तालुका एक बाजार समिती योजनाची घोषणा केली होती. राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने राज्य सरकाने आता प्रत्येक तालुक्यासाठी बाजार समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केला. जिल्ह्यातील या नव्याने स्थापन होणाऱ्या बाजार समितीसाठी किमान १० आणि कमाल १५ एकर जागा आवश्यक असल्याचे शासन आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक तालुकास्तरावर आता या जागेचा शोध सहकार विभागाला घ्यावा लागणार आहे. An agricultural produce market committee in the taluk