विविध धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे आयोजन
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अडूर विभाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त श्री.सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात अडूर, नागझरी, कोंडकारूळ, वेळणेश्वर, वाडदई, पिंपर या गावांचा समावेश होतो. Amrit Mahotsav Program of Adur Society
यानिमित्ताने सकाळी ०८ वा. श्री.सत्यनारायण महापूजा, सकाळी १० वाजता ७५ वी अधिमंडळाची वार्षिक सभा, सकाळी ११ ते दुपारी ०१ वा. मान्यवरांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभ, दुपारी ०१ ते ०३ या दरम्यान स्नेहभोजन कार्यक्रम, सायंकाळी ०७ वा. गावातील सुस्वर भजने यावेळी आयोजित करण्यात आली आहे. तरी या कार्यक्रमास संस्था कार्यक्षेत्रातील सर्व सभासद, शेतकरी, हितचिंतक, यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन अडूर विभाग विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. Amrit Mahotsav Program of Adur Society
या कार्यक्रमास डॉ.अनिल जोशी – संचालक, आर.डी.सी.बँक, डॉ.सोपनजी शिंदे– जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी, श्री.सुशांत घोलप- सहा.निबंधक, सहकरी संस्था चिपळूण, श्री.कुमार देवरुखकर- तालुका सह. अधि. श्रेणी-१, सह. संस्था गुहागर, श्री.नंदन खानविलकर- सहा. सरव्यवस्थापक, क्षेत्रीय कार्या. पाटपन्हाळे, सौ.शैलजा गुरव- सरपंच, ग्रा.पं.अडूर, श्री.नितीन पोळेकर- सरपंच, ग्रा.पं. वेळणेश्वर, श्री.उमेश आरस- उपसरपंच, ग्रा.पं.अडूर, सौ.निलिमा अडूरकर- सरपंच, ग्रा.पं. कोंडकारुळ, श्री.अनिल घाणेकर- सरपंच, ग्रा.पं. पिंपर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. Amrit Mahotsav Program of Adur Society