अमेरिकेने केले भारताचे कौतुक
गुहागर (ता. 26) : कोरोनाच्या लढाईमध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका होती. असे प्रतिपादन अमेरिकेचे कोरोना व्हायरस प्रतिसाद समन्वयक डॉ. आशिष झा यांनी केले. ते व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. अशी माहिती पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने दिली आहे. व्हाईट हाऊसने केलेल्या भारताच्या कौतुकामुळे पुन्हा एकदा भारताची शान जागतिक स्तरावर उंचावली आहे. America praised India
भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे 25 ऑक्टोबरला रात्री 3 वा. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना अमेरिकेचे कोरोना व्हायरस प्रतिसाद समन्वयक डॉ. आशिष झा म्हणाले की, जो बिडेन प्रशासनासाठी कोरोना व्हायरसवरील QUAD भागीदारी महत्त्वपूर्ण होती. QUAD हा ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे. मला वाटते की, भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे. तिच्या अविश्वसनीय उत्पादन क्षमतेमुळे, (भारत) लसींचा मोठा निर्यातदार आहे. ही गोष्ट केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. जागतिक स्तरावर कोविड-19 विरूद्ध लसींचा पुरवठा करण्यात भारताची महत्त्वपूर्ण आहे. America praised India
भारताने कोराना लशीचा पुरवठा कोणत्या देशांना केला
लस ‘मैत्री’ उपक्रमांतर्गत, भारताने जगातील 103 देशांना 267 दशलक्ष कोविड-19 लसींचा पुरवठा केला आहे. तसेच संयुक्त राष्ट्र संघालाही लसीचा पुरवठा केला. मैत्री उपक्रमांतर्गत खालील देशांना भारताने लस पुरवली. America praised India
बांग्लादेश, म्यानमार, नेपाल, भुतान, मालदिव, मॉरिशिअस, सेचिलीझ, श्रीलंका, बहारीन, ब्राझिल, मोरोक्को, ओमान, इजिप्त, अल्जेरिया, दक्षिण आफ्रिका, कुवेत, युएई, अफगाणिस्तान, बारबाडोस, डोमिनिका, मेक्सिको, पाकिस्तान, डोमिसीयन रिपब्लिक, सौदी अरेबिया, इल सलव्हाडोर, अर्जेंटिना, सिरबिया, मंगोलिया, युक्रेन, घाना, आयव्हरी कोस्ट, लुसिया, किट्टी व नेवीस, विन्सेंट व ग्रेनडाइन्स, सुरीनाम, अँटीग्यु बारबुडा, कांगो, ॲगोला, गामबिया, नायझेरीया, कंबोडिया, केनिया, लिस्थो, रवांडा, साओ टोम व प्रिन्सीपी, सेनेगल, गौतेमाला, कॅनडा, माली, सुदान, लिबेरीया, मलावी, युगांडा, निकारागुड, गुयाना, जमैका, युके, टोगो, डजीबौटी, सोमालिया, सिरिया लिओना, बेल्झी, बोस्टवाना, मोझाम्बिक्यु, इथीओपिआ, ताझिकिस्तान, बेनिन, इस्वातिनि, बहमास, कॅपे वेर्डे, इरान, उझेबिकिस्थान, सोलोमान आइलॅण्ड, लाओस, नामिबिआ, बोलीबिआ, दक्षिण सुदान, पराग्वे, फिजि, झिम्बॉम्बे, नायगर, पॅलेस्टाईन, येमेन, नौरु, त्रिनिदाद व टोबागो, गुनिया, पेपुड न्यु गुनिया, झाम्बिया, कोमोरोस, कमेरुन, मौरिटानिआ, अलबानिआ, सिरिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅण्डस्, न्युझिलंड, युएसए, थायलंड America praised India