संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा काजूर्ली नं.२ या शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक हात एकवटले असून माजी विद्यार्थ्यांनी शालेय विकासासाठी ग्रुप तयार केला होता. Alumni Help for Development of Kajurli School


अल्पावधीतच या ग्रुपच्या माध्यमातून या शाळेचे माजी विद्यार्थी यांनी शाळेचा विकास हाच ध्यास घेऊन मनामध्ये पक्का निर्धार करुन या शाळेचे माजी विद्यार्थी श्री.पांडुरंग सदाशिव हुमणे अध्यक्ष पनवेल विद्यार्थी वाहक रिक्षा संघटना पनवेल, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहक संघटना यांच्या माध्यमातून पनवेल विद्यार्थी वाहक रिक्षा संस्था पनवेल संचालक मंडळ यांजकडून विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याकरिता आरो प्लांट वॉटर फिल्टर, दहा सतरंज्या, ४१ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक किट, कंपास पेटी, दोन बॉक्स भरून विद्यार्थ्यांसाठी खाऊ असे सुमारे ४० ते ५० हजाराच्या वस्तूंची देणगी या संस्थेने शाळेसाठी दिली. तसेच या शाळेचे आदर्श माजी शिक्षक श्री. दशरथ रघुनाथ साळवी यांनी शाळेसाठी १००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भेट दिली. तसेच श्री.दशरथ साळवी यांची नात कुमारी अहिल्या मयूर जाधव या तीन वर्षाच्या चिमुकलीने आपल्या खाऊचे २२७०/- रुपये शाळेच्या विकासासाठी भेट दिले. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी वाहक परिवर्तन संस्था बेलापूरचे अध्यक्ष श्री संतोष गोळे यांनी शाळेसाठी १०००/- रुपये रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. Alumni Help for Development of Kajurli School


या कार्यक्रमासाठी पनवेल विद्यार्थी वाहक रिक्षा संघटना पनवेल चे सर्व संचालक मंडळ, काजुर्ली गावच्या माजी सरपंच श्रीमती. रुक्मिणी सुवरे, उपसरपंच श्री.सुधाकर गोणबरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. अंजली कुवारे शिक्षण तज्ञ श्री. नारायण मोहिते सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक वर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या शाळेतील शिक्षिका सौ.श्रावणी पागडे, सौ.सावी सुर्वे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी कु.शर्वानी डिंगणकर व श्रावणी निवाते यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. Alumni Help for Development of Kajurli School