• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

by Manoj Bavdhankar
June 3, 2025
in Guhagar
389 4
0
Alumni gathering of Guhagar College
764
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुन्हा भेटीला कटिबद्ध

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने कॉलेजमधील केलेली मस्ती, एकत्र केलेला अभ्यास, एकत्र केलेला प्रवास, त्यातल्या गमती जमती, शिक्षकांनी केलेल्या शिक्षा, मित्रांमुळे खाल्लेला मार अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पागोष्टी करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. योगायोगाने शाळेतील शिक्षक श्री आठवले सर यांचा लग्नाचा 50 वा वाढदिवस हॉटेल शांताई मध्ये संपन्न होत आहे हे समजल्यानंतर त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. Alumni gathering of Guhagar College

1989 ते 1990 साली अकरावी कॉमर्स मध्ये शिक्षण घेतल्यानंतर जवळपास 35 वर्षांनी एकत्र येऊन स्नेहसंमेलन करण्याचा योग 1 जून 2025 रोजी हॉटेल शांताई, मोडका घर, गुहागर येथे पार पडला. सकाळी 9 वाजता सर्वजण जमण्यास सुरुवात झाली. सकाळच्या अल्पोपहार नंतर श्री अजित अहिरराव व सौ ज्योती सहस्त्रबुद्धे – परचुरे मॅडमनी उपस्थितांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश कोळवणकर यांनी केले. Alumni gathering of Guhagar College

गुहागर कॉलेजमधून शिक्षण घेऊन हे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. गेले आठ दिवस सर्वत्र होत असलेला पाऊस आणि येणाऱ्यांची कमी संख्या यामुळे हे स्नेहसंमेलन होईल की नाही याची भीती होती. परंतु जुन्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा 35 वर्षानंतर भेटण्याच्या आतुरतेने सर्वजण मुंबई, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून वरुण राजाच्या  हजेरीत 1 जून ला उपस्थित राहिले. Alumni gathering of Guhagar College

फार कमी वयात सकाळ मीडिया चा उद्योग गौरव हा पुरस्कार प्राप्त झालेले श्री सचिन बाईत, नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेले श्री वैभव गुहागरकर, नगरसेविका म्हणून कार्य पाहिलेल्या सौ ज्योती सहस्रबुद्धे परचुरे मॅडम,  सलग 15 वर्षे सरपंच पद भूषविलेले श्री संतोष आंब्रे आणि स्नेहसंमेलन यशस्वीपणे आयोजन केलेले श्री राजेश विंचू या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Alumni gathering of Guhagar College

त्यानंतर सर्वांनी आपण सध्या करत असलेले कार्यक्षेत्र, जीवनामध्ये प्राप्त केलेले यश, आपली माहिती आणि आपल्या कुटुंबाची माहिती देऊन आपला परिचय दिला. यशस्वी उद्योजकांनी मार्गदर्शनपर सल्ले दिले. हौशी विद्यार्थ्यांनी गाणी आणि नृत्य सादर करून आपल्यातील कलागुणांची सादरीकरण केले. अनुपस्थित काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉल करून सर्वांशी संवाद साधला. जेवणानंतर पुन्हा एक ओपन फोरम चर्चा करून आणि आपल्या वर्गातील सध्या हयात नसलेल्या मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Alumni gathering of Guhagar College यावेळी अजित अहिरराव, सचिन बाईत, चंद्रकांत साळवी, विनायक झगडे, राजेश कोळवणकर, राजेश विंचू, पिरोज आरेकर, संतोष बारगोडे, वैभव गुहागरकर, सुनील दणदणे, मिलिंद गुरव, पुंडलिक घाडे, संतोष शिंदे, उत्तम कोलगे, राजेश भोसले, संतोष आंब्रे, अनिल घाणेकर, दीपक वेस्वीकर, वर्षा कनगुटकर, आशा तुळसणकर, हेमचंद्र मोरे, ज्योती सहस्त्रबुद्धे, अनिता आरेकर – बोरकर, विष्णू सांगळे उपस्थित होते. Alumni gathering of Guhagar College

Tags: Alumni gathering of Guhagar CollegeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share306SendTweet191
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.