उपट सुंभ्यानी दुसऱ्याच्या कामांचे नारळ फोडण्यापेक्ष स्वतः निधी आणावा
गुहागर, ता. 15 : आज सरकारमध्ये नसलो तरीही उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना या मतदार संघासाठी भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण मतदार संघात वाडीवस्तीवर सातत्याने होणारी भूमिपूजने पाहून केवळ राजकीय आकसापोटी व अज्ञानातून काही उपट सुंभ्यानी आ. भास्कर जाधव यांच्यावर आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी वेळीच असे प्रकार थांबवले नाहीत तर त्यांना योग्य ते उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सचिन बाईत व विनायक मुळे यांनी दिला. Allegations against MLA Jadhav for political motives
भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून आ. भास्कर जाधव व विक्रांत जाधव यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या टीकेचा आणि आरोपांचा आज शहरातील पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. यावेळी माजी सभापती विलास वाघे, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, इम्रान घारे, शहराध्यक्ष विनायक जाधव, राज विखारे, सरपंच समित घाणेकर, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, सारिका कनगुटकर आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. Allegations against MLA Jadhav for political motives
२००९ पूर्वी गुहागर वासियांना विकास काय असतो हे माहीत नव्हते. ते जाधव साहेबांच्या गुहागर प्रवेशानंतर प्रत्येकाला अनुभवायला मिळाले. नाहक टीका, आरोप करण्यापेक्षा राज्यात तुमची सत्ता आहे. त्या सत्तेचा वापर करून मतदार संघात विकासकामे आणून नारळ फोडा, असा सल्ला श्री. बाईत व श्री. मुळे यांनी दिला. या मतदारसंघात केवळ पिता-पुत्र कामाचे शुभारंभ करतात असा आरोप करण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले की, केवळ पिता-पुत्र शुभारंभाचा नारळ फोडत नाही तर येथील जेष्ठ गाव प्रमुख, सरपंच यांच्या हस्ते शुभारंभ करण्याची प्रथा आ. जाधव यांनी सुरू केली. नव्याने होणाऱ्या कामांची संख्या एवढी आहे की, त्यांना प्रत्यक्ष शुभारंभ करण्यासाठी वेळही नसतो. भास्कर जाधव फक्त मतदार संघासाठी कुठला विषय मांडत नाहीत तर कोकणच्या विकासासाठी सातत्याने आधिवेशनात विषय मांडत असतात. कोकणासाठी जो नेता भांडतो आहे, त्याला पाठबळ देण्याचे सोडून त्याची बदनामी करण्याचे काम चालू करण्यात आले आहे, असा आरोप विनायक मुळे यांनी विरोधकांवर केला. Allegations against MLA Jadhav for political motives
काही दिवसांपूर्वीच मुंढर फाटा रस्ता, आरे बौद्धवाडी चिंचवाडी रस्ता व आवरे ते भातगाव 24 किलोमीटरचा रस्त्याचे भूमिपूजन आ. भास्कर जाधव यांनी केले. ही कामे पालकमंत्री उदय सामंत यांच्यामार्फत मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मुंढर रत्यासाठी येथील सरपंच रामाणे यांच्या मागणीनंतर प्रभाकर शिर्के यांनी पाठपुरावा केला. आरे बौद्धवाडी रस्त्यासाठी तत्कालीन सरपंच श्रीकांत महाजन यांनी मागणी केली होती. तसेच आवरे ते भातगाव रस्त्यासाठी येथील सरपंच व ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा रस्ता भास्कर जाधव यांनी मंजूर करून घेतला. 2007 पूर्वी आमदार भास्कर जाधव येण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे एकही रस्ता बांधकाम विभाग वर्ग झाला नव्हता. जाधव यांच्या पुढाकाराने हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करून त्यानंतर या रस्त्यांना मोठा निधी मिळू लागला असे स्पष्ट केले. Allegations against MLA Jadhav for political motives
श्री. मुळे यांनी एन्रॉन कोणी बुडवला असा सवाल करत देवघर माळरानावर एमआयडीसीमध्ये पहिल्यांदा एचपीसीएल प्रकल्पाला विरोध झाला. त्यानंतर भास्कर जाधव मंत्री असताना येथेच टेक्स्टाईल पार्क हा प्रदूषण विरहित प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, त्यालाही राजकीय सुडबुद्धीने व अज्ञानापोटी विरोध करण्यात आला. दोन वर्ष उद्योग मंत्री जिल्ह्याचे असताना एक तरी उद्योग का आणला नाही याचे उत्तर उपट सूंभ्यानी दिले पाहिजे. Allegations against MLA Jadhav for political motives