अडूर बौध्दजन सहकारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गुहागर, 3 : तालुक्यातील अडूर गावातील बौध्द विहारमध्ये जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांची आठ दिवसाच्या आत बदली न करावी. अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी गुहागर तहसील कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणाला बसू. असे निवेदन अडूर बौध्दजन सहकारी संघाने जिल्हाधिकऱ्यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सचिन यांनी दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दिवशी काही ठराविक हितशत्रुंच्या दबावाला बळी पडुन पोलिस फौजफाटा सोबत आणुन आम्हाला सुमारे दिडशे लोकांना धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यास मज्जाव केला. त्यावेळी एका लहान मुलीच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याची परवानगी द्यावी किंवा तुम्ही स्वतः बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घाला. अशी विनंती त्यांना केली. मात्र पोलिस निरिक्षक सावंत यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यास अटकाव केला. या घटनेबाबत २१ ऑक्टोबर 2025 ला पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच ११ नोव्हेंबर २०२४ ला उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण यांच्याकडे देखील लेखी तक्रार करण्यात आली. परंतु कोणीच या घटनेची गांभीर्याने दखल घेतली नाही. दरम्यान ६ डिसेंबरला २०२४ ला होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या आदल्यादिवशी ५ डिसेंबरला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रतिवर्षी प्रमाणे बौध्द विहारात मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी आम्ही ५० ते ६० ग्रामस्थ विहाराजवळ एकत्र जमलो. यावेळी विहाराला कुलूप लावल्याचे तसेच दोन होमगार्ड आणि प्रभारी पोलिस पाटील जाधव उपस्थित असल्याचे दिसले. याबाबत पोलीस निरिक्षकांशी संपर्क साधला तेव्हा प्रांत अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे कुलूप लावले आहे. तुम्हाला कार्यक्रम करता येणार नाही, असे सावंत यांनी सांगितले. ६ डिसेंबरला सकाळीच बौध्द विहारासमोर सुमारे १२ ते १३ सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा होता. वास्तविक या ठिकाणी कार्यक्रम करण्यास कोणाचीही हरकत किंवा तक्रार नव्हती. तसेच विहाराला कुलुप लावण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी कोणतेही आदेश दिले नसल्याचे समजले.
यावरुन पोलिस निरिक्षक सचिन सावंत हे सातत्याने आमच्या धार्मिक भावना दुखावुन आमच्या समाजाला लक्ष्य बनवुन आमचा अपमान करत आहेत. झालेल्या घटनांची दखल जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस प्रशासनाने न घेता पोलिस निरिक्षक सावंत यांना पाठीशी घालुन एकप्रकारे त्यांच्या जातीयवादाला खतपाणी घातलेले आहे. पोलिस निरिक्षक सावंत यांच्या वर्तनामुळे आमच्या गावात समाज बांधवांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला असुन त्यांची तत्काळ बदली न झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे
या निवेदनाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, मौजे अडुर ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून बौद्ध समाजात सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करण्यावरून दोन गटात वाद सुरू होते तसेच यासंदर्भात दोन्ही पार्टीकडून सदर ठिकाणी कार्यक्रम करण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याबाबत एकमेकांचे विरोधात लेखी अर्ज पोलीस ठाणे येथे केलेले आहेत सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता त्यामुळे सदर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही त्या अनुषंगाने यापूर्वी आम्ही स्वतः बीट अंमलदार यांनी वेळोवेळी पोलीस ठाणे स्तरावर बैठका घेऊन सदर वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला दोन्ही गटातील वाद सामंजसपणाने मिटून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. तसेच दिनांक 04-01-2025 रोजी दोन्ही गटातील प्रमुख व्यक्तींची पोलीस ठाणे येथे बैठक लावून सदर वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
पोलीस निरीक्षक सावंत यांच्यावरील आरोप चुकीचे
बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या अपमानाची घटना घडलीच नाही, दुसऱ्या गटातील ग्रामस्थांचे म्हणणे
गुहागर, ता. 04 : गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी अडूर बौद्धवाडी येथील कोणत्याही ग्रामस्थाला धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यास मज्जाव, डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालू देणार नाही, सगळ्यांना जेलमध्ये टाकणार किंवा बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यास नकार देवून कोणताही अपमान केलेला नाही. उलट सचिन सावंत यांनी वेळोवेळी दोन्ही गटातील लोकांना विनंत्या करून एकत्र उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले. दिलीप जाधव आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस प्रशासनावर केलेले आरोप चुकीचे आणि खोडसाळ आहेत, अशी प्रतिक्रिया या घटनेप्रसंगी उपस्थित असलेले सुनील गंगाराम जाधव, मिलिंद धोंडू जाधव, आनंदा भिकाजी जाधव यांनी दै. सागरशी बोलताना दिली. Allegation against police inspector is wrong
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती वाडीतील विश्वशांती सार्वजनीक बुध्दविहारामध्ये साजरी करण्यात येते. आम्ही सर्व वाडीतील ग्रामस्थ मिळुन दरवर्षी जयंती साजरी करीत होतो. परंतु आमच्या वाडीत काही तात्वीक कारणांमुळे मतभेद होवुन आमचे दोन गट निर्माण झाले आहेत. जवळपास गेले दोन वर्षोपासुन ते आजतागायत आमच्याविरोधात असणा-या गटाकडुन आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही एकत्र समाजाचे व एकाच संघटनेचे सभासद असुनहि विहारात होणा-या कोणत्याही समाजीक, धार्मीक, सांस्कृतीक कार्यक्रम व सभेत आम्हा १४ कुटुंबीयांना सहभागी करुन घेत नाहीत. विहारातील सार्वजनीक वस्तु आम्ही वापरु म्हणुन टाळेबंद करुन ठेवल्या आहेत. विरोधी गटातील दिलीप सदाशिव जाधव (अध्यक्ष ), नंदकुमार यशवंत जाधव, विलास नारायण जाधव, यशवंत धर्माजी जाधव, अशोक गोपाळ जाधव, प्रविण गंगाराम जाधव, अमित अशोक जाधव, संतोष भागुराम जाधव, आनंदा सदाशिव जाधव, दिपराज प्रभाकर जाधव हे आमच्यावर अन्याय करत आहेत. Allegation against police inspector is wrong
आम्हाला मौजे अडुर येथील बौध्दजन सहकारी संघ, पिंपर विभाग क्र. ५ मौजे अडुर (स्थानिक ) शाखा क्र.४० अध्यक्ष दिलीप सदाशिव जाधव, विलास नारायण जाधव, सचिन सदानंद जाधव, राजेंद्र प्रभाकर जाधव वगैरे ९८ ग्रामस्थांनी गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्याबाबत केलेला तक्रारी अर्ज, तसेच २६ जानेवारी २०२५ रोजी तहसिल कार्यालायासमोर उपोषणा संदर्भात केलेला तक्रारी अर्ज पूर्णपणे चुकीचा आणि खोडसाळ आहे. आम्ही दोन्ही गटातील सर्व ग्रामस्थ एकत्र व्हावे, याकरीता आम्ही बौध्दजन सहकारी संघ पिंपर विभाग नं.५ यांच्याकडे एकुण ६ अर्ज केलेले आहेत. तसेच पोलीस पाटील नरवण पदभार अडुर यांच्याकडे १ अर्ज दिलेला आहे. तसेच अध्यक्ष बौध्दजन सहकारी संघ तालुका गुहागर यांच्याकडे ४ वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु आम्हाला वरील संघटनांकडुन आजपर्यत न्याय मिळालेला नाही. दि. ७ फेब्रु. २०२४ रोजी माता रमाई आंबेडकर जयंतीवेळी दुस-या गटातील लोकांनी वाद घालुन अडथळा आणुन दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. म्हणुन आम्ही दि. ८ एप्रिल २०२४ रोजी गुहागर पोलीस ठाणे येथे १४ एप्रिल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना दुस-या गटाकडुन व्यत्यय येवु नये म्हणुन अर्ज दिलेला होता. म्हणुन पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी दुस-या गटातील दिलीप सदाशिव जाधव, विलास नारायण जाधव, यशवंत धर्माजी जाधव यांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात आमच्या समक्ष बोलावले होते. परंतु त्यांनी एकत्ररित्या बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यास स्पष्ट नकार दिला. Allegation against police inspector is wrong
त्यानंतर दि. १२ एप्रिल २०२४ रोजी गुहागर पोलीस ठाणे येथे आमचे गटाकडुन विरोधक हे एकत्रितरित्या जयंती साजरी करण्यास तयार नसल्याने दोन्ही गटातील दोन – दोन व्यक्ती मिळुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन मानवंदना देवुन नियमांचेपालन करु असे लिहुन दिले होते. तसेच दोन्ही गटात वाद होवुन भांडणतंटा होवु नये याकरीता १४ एप्रिल रोजी जयंती पासुन सर्व कार्यक्रमाकरीता बौध्दविहाराचे समोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. दोन्ही गट एकत्र यावे याकरीता बौध्दजन सहाकारी संघाचे अध्यक्ष सुरेश सावंत यांनी देखील प्रत्यक्ष येवुन विरोधकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे दि. २ जाने. २०२५ रोजी अडुर ग्रामपंचायत ग्रामसभेत सदर वादाबाबत ग्रामस्थांनी आमचे वाडीतील दोन गटांचा वाद मिटविण्याचा विषय काढला असता विरोधी गटातील यशवंत धर्माजी जाधव, दिलीप सदाशिव जाधव यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना सांगीतले की, हा विषय तुम्ही घेवु नका, तुमचे इतर ठराव पास करा. दोन्ही गट एकत्र यावे याकरीता विरोधी गट हे कोणासोबत चर्चा करत नाही. एकत्र बसत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. दि. 12 ऑक्टो. रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यास कोणालाही मज्जाव केलेला नाही. किंवा अन्य कोणतीही घटना घडलेली नाही. या घटनेचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. केवळ आपला उद्देश सफल होण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्यावर चुकीचे आणि खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले आहे, असे सुनील गंगाराम जाधव म्हटले आहे. Allegation against police inspector is wrong
दिलीप सदाशिव जाधव, विलास नारायण जाधव, नंदकुमार यशवंत जाधव, दीपराज प्रभाकर जाधव, राजेंद्र प्रभाकर जाधव, अमित अशोक जाधव, संतोष भागूराम जाधव, मालती यशवंत जाधव, यशवंत धर्माजी जाधव यांच्यापासून जीवितास धोका असून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी गुहागर पोलीस ठाणे यांच्याकडे अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले. Allegation against police inspector is wrong
पोलीस निरीक्षक श्री. सावंत यांनी वाद मिटवण्याठी प्रयत्न केले – सुरेश सावंत
अडूर बौद्धवाडी येथील दोन गटातील वाद मिटवण्याठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी अनेकदा प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर सामाजिक पातळीवर देखील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचे बौद्धजन सहकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश सावंत यांनी सांगितले. दोन्ही गटातील वाद मिटवण्यासाठी मी स्वतः व सामाजिक संघटने मार्फत मिटवा याकरिता प्रयत्न केले. परंतु, दुर्दैवाने दिलीप सदाशिव जाधव व अन्य ग्रामस्थांनी सहकार्य केले नाही. पोलीस प्रशासनाने तर माझ्या आधीपासूनच दोन्ही गटातील वाद मिटून दोन्ही गट एकत्र यावे यासाठी अनेकदा प्रयत्न केले. 98 जणांच्या गटाने पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही, असे सावंत म्हणाले. Allegation against police inspector is wrong