गुहागर, ता. 26 : भारतातील 127 संप्रदायातील सर्व प्रमुख ज्या समितीमध्ये कार्यरत आहेत. अशा अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज- महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी श्री स्वामी दत्त फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य संस्थापक-अध्यक्ष श्री श्री 1008 महामंडलेश्वर डाॅ. शंकर आनंदा लोकरे (आण्णा) शंकरानंद योगी महाराज यांची निवड करण्यात आली. All India Sant Samiti
श्री स्वामी दत्त फाऊंडेशन आणि श्री स्वामी दत्त अध्यात्मिक उन्नती केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रात अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अविरत वेगवेगळे उपक्रम लोकांपर्यत पोहोचवून अंधश्रद्धा निर्मुलन तसेच वैदिक मंत्राचा प्रचार व प्रसार करत आहेत. ह्याच उल्लेखनिय कार्याची दखल घेवून अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज-राष्ट्रीय प्रमुख आचार्य शुभेश शर्मनजी यांच्या संमतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष-महंत आचार्य पीठाधीश्वर डाॅ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. अखिल भारतीय संत समितीच्या वतीने देव, देश, धर्म, गौ-गंगा रक्षा व संतांच्या रक्षणाचे कार्य केले जाते. महामंडलेश्वर डाॅ.शंकर आनंदा लोकरे (आण्णा) महाराज यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. All India Sant Samiti