गुहागर, ता. 17 : चिपळूण मधील अखिल भारतीय बाल कुमार साहित्य संस्थेची नवीन कार्यकारणी प्रकाश देशपांडे यांनी जाहीर केली. त्यामध्ये अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, उपाध्यक्ष बापू काणे , डॉ. अरविंद पोतदार, कार्यवाह प्राची जोशी, सह कार्यवाह मेधा लोवलेकर, कोषाध्यक्ष प्रशांत देवळेकर, सह कोषाध्यक्ष मानसी टाकळे तसेच सदस्य शिवाजी शिंदे, रविंद्र गुरव, अपूर्वा फणसे, पंकज तांबट आणि सल्लागार पदी राष्ट्रपाल सावंत, मंगेश खेडेकर अर्चना वडके यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या उद्दिष्टप्रमाणे संमेलन, विविध उपक्रम घेण्यात येतील. नूतन कार्यकारणीचे सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. All India Bal Kumar Literature Society


गेली पन्नास वर्ष कार्यरत असणारी बाल कुमार साहित्य संस्था मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी त्यांनी स्वतः विविध विषयावर वाचन, लेखन, चर्चा मधून आपले विचार मांडावेत, मुलांमध्ये सभाधिष्टपणा यावा थोडक्यात त्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास व्हावा यासाठी १९७५ पासून ही संस्था कार्यात आहे. मुलांसाठी साहित्य संमेलन घेणे. त्यांच्या वयोगटसाठी लेखन करणाऱ्या व्यक्तीना प्रोत्साहन देणं. नवसाहित्य निर्मिती करण हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी या बाल कुमार साहित्य संस्थेच्या शाखा निर्माण करणं हे कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात नवीन शाखा निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. चिपळूण ही कोकण मुख्यतः रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्य, कला, सांस्कृतिक कार्याची कर्मभूमी, केंद्र मानले जाते. याठिकाणी शाखा निर्माण व्हावी अशी संस्थेची अनेक वर्षे इच्छा होती. चिपळूण मधील साहित्य, कला सांस्कृतिक, वाचन आणि इतिहास संशोधन चळवळीतील अग्रगण्य नावं लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे पंचविस वर्षं कार्याध्यक्ष असणारे सध्याचे समन्वयक प्रकाशजी देशपांडे सर यांच्याशी या संस्थेचे प्रमुख ज्येष्ठ साहित्यिक माधव राजगुरू यांनी प्रत्यक्ष भेटीत इच्छा व्यक्त केली. All India Bal Kumar Literature Society
अनेक वर्षे देशपांडे यांच्याही मनात मुलांसाठी अशी साहित्य संस्था चिपळूण मध्ये सुरू करण्याचा मानस होता. त्यांनी लोटिस्मा वाचनालय मधील पदाधिकारी सदस्य यांच्याशी चर्चा करून राजगुरू यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्याच उपस्थितीत चिपळूण मधील साहित्य प्रेमींना आवाहन करुन लोटिस्मा वाचनालय मधील बाळशास्त्री जांभेकर सभागृहात मिटिंग आयोजित केली. या मीटिंगसाठी माधव राजगुरू त्यांचे सहकारी चिपळूण मध्ये उपस्थित राहिले. त्यांचा उचित सन्मान वाचनालय यांनी केला. राजगुरुनी बालकुमार संस्थेचा संपूर्ण इतिहास, कार्य, घेतलेली संमेलन, यापुढील उद्देश स्पष्ट केला. त्यांच्या समवेत पुण्यातून चेतना तांबट तथा वडके, विकास वडके, आणि विश्वास वसेकर होते. All India Bal Kumar Literature Society