दिल्ली कोर्टाचा निर्णय, केसलाही मिळाली स्थगिती
मुंबई, ता. 07 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. २०२३ मध्ये आयकर विभागाने दादा, पार्थ पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या चार कंपन्यांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. Ajit Dada’s property was freed
दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाने अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे. अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. पण अखेर कोर्टाच्या आदेशानंतर या मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत. Ajit Dada’s property was freed
विशेष म्हणजे अजित पवार यांनी 5 डिसेंबरला सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने काही महिन्यांपूर्वी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या काही मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाने संबंधित मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली होती. या कारवाई विरोधात पवार कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली होती. Ajit Dada’s property was freed
संबंधित कारवाई ही 2023 मध्ये झाली होती. त्याविरोधात संबंधित कारवाई स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका वारंवार करण्यात आल्या होत्या. यानंतर स्थगितीची ऑर्डर काढण्यात आली होती. पण जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता ट्रिब्यूनल कर्टाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. Ajit Dada’s property was freed